शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

कांदा २० रुपयांनी स्वस्त; दिवाळीपूर्वी भाव झाले कमी; डिसेंबरपर्यंत चढउतार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 10:15 AM

बाजार समितीत २८ ते ४८ रुपये; प्रतिकिलो २ ते ६ रुपयांची घसरण

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यात कांदा दरामध्ये पुन्हा घसरण  झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये दर ३० ते ५४ रुपये प्रतिकिलोवरून २८ ते ४८ रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये दर ८० ते १०० रुपयांवरून ६० ते ७५ रुपये झाले आहेत. राज्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये प्रतिदिन चढउतार होऊ लागले आहेत. दर वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर ग्राहकांची चिंता वाढली होती. पण दोन दिवसांपासून पुन्हा दर घसरू लागल्यामुळे ग्राहकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी मुंबई बाजार समितीत ७६१ टन कांद्याची आवक झाली असून, २८ ते ४८ रुपये किलो दराने तो विकला गेला. प्रतिकिलो २ ते ६ रुपयांची घसरण झाल्याचे पाहावयास मिळाले.

डिसेंबरपर्यंत चढउतार

डिसेंबरमध्ये नवीन कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध होईल. तोपर्यंत बाजारभावामध्ये चढउतार सुरू राहील. भाव काही प्रमाणात कमी झाले असले तरी पुन्हा दर वाढू शकतात, अशी शक्यताही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

किरकोळ मार्केटमध्येही दर कमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ८० ते १०० रुपये किलोदराने कांद्याची विक्री होत होती. गुरुवारी हे दर ६० ते ७५ रुपयांवर आले आहेत.

टॅग्स :onionकांदाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई