नाशिक, दि. 3 - लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात गुरूवारी 750 रूपयांची वाढ झाल्याने कांद्याला सर्वाधिक 2650 रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला आहे. या भाववाढीमुळे कांदा महागण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकरी मात्र आनंदी आहे. आज बाजार समितीत एक हजार वाहने भरुन कांदा आला आहे.कांद्याचे भाव अधिक वाढतात की कमी होतात हे आज सायंकाळी समजणार आहे. पावसाने गुजरातमधील कांदा खराब झाला आहे. तर मध्यप्रदेश राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून 800 रूपये प्रतिक्विंटल दराने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे मध्य प्रदेशातून या कालावधीमध्ये इतर राज्यात जाणारा कांदा रवाना झाला नाही. कांद्याच्या भावात तेजी दिसत असली तरी गेल्या पाच महिन्यांपासून साठवणूक केलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहे. पाच सहा महिन्यापांसून साठवलेल्या कांद्याचे वजन कमी होते.तसेच खराब होणाऱ्या कांद्याला चाळी बाहेर फेकले जाते. त्यामुळे कांद्याच्या भावात तेजी आली तरी प्रत्यक्ष या तेजीचा फारच कमी लाभ कांदा उत्पादकांना होत आहे. मात्र हाच कांदा शहरी भागात अधिक भावाने ग्राहकांना खरेदी करावा लागणार आहे.
कांदा रडवणार ? लासलगावमध्ये प्रतिक्विंटल कांद्याचा भाव 2650 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 2:03 PM
नाशिक, दि. 3 - लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात गुरूवारी 750 रूपयांची वाढ झाल्याने कांद्याला सर्वाधिक 2650 रूपये प्रतिक्विंटल ...
ठळक मुद्दे पावसाने गुजरातमधील कांदा खराब झाला आहे. मध्य प्रदेशातून या कालावधीमध्ये इतर राज्यात जाणारा कांदा रवाना झाला नाही.