लासलगाव (जि. नाशिक) : अन्य राज्यात मागणी वाढल्याने येथील बाजारपेठेत कांद्याला बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल भावात २५१ रुपयांची तेजी येऊन १४५१ रुपये प्रतिक्विंटल हा हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला.मध्य प्रदेश सरकारने ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी केल्यामुळे मध्य प्रदेशातून इतर राज्यांत कांदा रवाना झाला नाही. पंजाब, हरयाणा व राजस्थान, दिल्ली या भागात नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्याने भाव तेजीत आले असून, पाच महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याला जास्तीतजास्त १४५१, सरासरी ११७० रुपये तर कमीतकमी ३०० रुपये भाव मिळाला. सकाळी ८५० वाहनांतील कांद्याचे लिलाव झाले. मागील सप्ताहात बाजारात उन्हाळ कांद्याची ९७,७१५ क्विंटल आवक झाली होती.नामपूरला १६०० रुपयांचा भावगुरु वारी नाशिक जिल्ह्यातील नामपूर बाजार समिती आवारात कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक १६०० रुपये भाव मिळाला. सटाणा बाजार समिती आवारात १४६६ रु पये दराने कांदा विकला गेला. नामपूरला सरासरी १२५० रुपये व कमीतकमी ७५० रुपये भाव होता.भावात तेजी आल्याने गेले पाच-सहा महिने साठवलेल्या कांद्याची आवक सध्या होत आहे. वजन व आकारमानात घट आहे. त्यामुळे भाव वाढले तरी विक्र ी होताना पूर्वी व आज विक्र ी होणारा कांदा याच्या वजनात घट असल्याने उत्पादकांना फार पैसे मिळणार, हा समज अयोग्य ठरेल.- जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव बाजार समिती
लासलगावला १४५१ रुपये कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 4:23 AM