शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

किरकोळ बाजारात कांदा १00 रुपयांच्या आतच; आवक वाढल्याने दर आवाक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 5:11 AM

मुंबई, ठाण्यात किरकोळ बाजारात मध्यम दर्जाचा कांदा ७0 ते ८0 रुपये किलोने विकला जात आहे.

नाशिक/सोलापूर/नगर : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोमवारी उन्हाळ कांद्याचे दर क्विंटलला सरासरी ९ ते १० हजार रुपये कायम होते. मात्र, बाजारात आता लाल कांद्याची आवक होऊ लागल्याने आणि त्याला क्विंटलला सरासरी ५ हजार रुपये दर असल्याने शहरांमध्ये कांदा किलोमागे १00 रुपयांच्या आतच आहे.मुंबई, ठाण्यात किरकोळ बाजारात मध्यम दर्जाचा कांदा ७0 ते ८0 रुपये किलोने विकला जात आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये कांद्याने शंभरी पार केलेली नाही. तुर्कस्थानसह इतर देशांतून कांद्याची आयात झाल्याने भाव आटोक्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात उमराणे बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला १२,५00 रुपयांचा क्विंटलला सर्वाधिक भाव मिळाला. सरासरी भाव ९000 रुपयांपर्यंत होते. लाल कांद्याला सरासरी ५,000 रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत लाल कांदा सरासरी ७,१00 रुपयाने विकला गेला.कांद्याची सर्वाधिक आवक झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरही सर्वाधिक मिळत आहेत. सोलापूरमध्ये २३ हजार ६०९ क्विंटल कांद्याची विक्री झाली. क्विंटलला सर्वाधिक १५ हजार रुपये इतका दर मिळाला. वाशीच्या एपीएमसी होलसेल मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत, असे कांदा बटाट्याचे घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले. सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव १०० ते १२० रुपये किलो आहे.भाववाढ होण्याची भीतीनाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला प्रथमच ११ हजार ३00 रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. अवकाळी पावसाने लाल कांद्याला फटका बसल्याने त्याचे उत्पादन घटले आहे. नवा कांदा अपेक्षित प्रमाणात बाजारात न आल्यास भाववाढ होण्याची भीती आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवकही आता रोडावली आहे. शेतकऱ्यांनी साठविलेला उन्हाळ कांदा संपत आला आहे.

टॅग्स :onionकांदा