पुणे : राज्यात यंदा कांद्याचे उत्पन्न सरासरीपेक्षा कमी झाले आहे. त्यातच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा प्रचंड उष्णतेमुळे खराब झाला. त्यामुळे सध्या मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याची आवक कमी असून, दरामध्ये वाढ होत आहे. रविवारी येथील बाजार समितीत कांद्याला प्रति १० किलोला १०० ते १३० रुपये दर मिळाला.जून संपत आला असताना अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप कांद्याची लागवड लांबली आहे. नवीन कांदा बाजारात दाखल होण्यास उशीर होणार आहे़ त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले़ तामिळनाडूतील सांबार कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यातच राजस्थानातील कांद्याचे व्यापारी महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये येऊन कांदा साठवणीसाठी चाचपणी करत आहेत़ त्यामुळे कांद्यात हळूहळू तेजी येऊ लागली आहे़राज्यातील कांदा केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल व ओडिशा येथे पाठविला जात आहे. रमजान महिन्याचे उपवास संपल्यानंतर कांद्याला मागणी वाढली असून आगामी काळात दर घटण्याची शक्यता कमी आहे.
कांद्याला पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 4:23 AM