जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, भावातही वाढ होत आहे. यामध्ये कांदे व मुळे व गवार शेंगाचा समावेश आहे.
अत्यल्प पावसाचा परिणाम जाणवत असून, जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागातून येणाऱ्या भाजीपाल्यांची आवक कमी झाली़ गेल्या आठवड्यात २५० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल असलेल्या कांद्याचे भाव ३०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल झाले़ मुळ्याच्या भावातही वाढ होऊन ११०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले़ ३२०० रुपये प्रतिक्विंटल गवार शेंग ३५०० रुपयांपर्यंत पोहोचली़ गेल्या आठवड्यात १०० रुपये प्रती क्ंिवटलने वाढ झालेले बटाट्याचे भाव या आठवड्यात १६०० रुपये प्रतिक्ंिवटलवर स्थिर असल्याने तेवढा दिलासा आहे. लिंबाच्या भावात ५०० रुपये प्रतिक्ंिवटलने कमी होऊन ते ४००० वरून ३५०० रुपये प्रतिक्ंिवटलवर आले आहेत.