मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीत आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. १६ मेपासून सुरू झालेल्या आॅनलाइन प्रक्रियेत मंगळवारपर्यंत ८४ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले आहेत, तर १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात आॅनलाइन नोंदणी अर्ज करावे लागणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अर्धवट भरलेले अर्ज, पूर्ण भरलेले अर्ज, कन्फर्म केलेले अर्ज आणि शाळा प्रशासनाने अप्रूव्ह केलेल्या नोंदणी अर्जांची संख्या ८४ हजार ८९५वर पोहोचली आहे. तर अर्धवट, पूर्ण, कन्फर्म झालेल्या पसंतीक्रम अर्जांची संख्या १४ हजार १३१ आहे. त्यामुळे शेवटच्या १० दिवसांत शाळांमध्ये आॅनलाइन अर्ज नोंदणीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नोंदणी केलेल्या एकूण अर्जांमध्ये एसएससी बोर्डातून सर्वाधिक म्हणजे ७३ हजार १११ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले आहेत. तर आयबी बोर्डातून सर्वांत कमी म्हणजे एक अपूर्ण आणि एक कन्फर्म नोंदणी अर्ज करण्यात आला आहे. याउलट आयबी बोर्डातील एकाही विद्यार्थ्याने अद्याप पसंतीक्रम अर्ज भरला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाणिज्य शाखेच्या एकूण १० हजार २६० जागा कमी झाल्या आहेत. याउलट वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची मिळणारी पसंती पाहता, यंदा वाणिज्यची कट आॅफ नव्वदी पार करण्याची शक्यता आहे, तर त्याखालोखाल कला शाखेच्या ४ हजार ९८० आणि विज्ञान शाखेच्या ४ हजार १६० जागांमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे या शाखांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसेल.>प्रवेशासाठी चुरस रंगणार अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा चांगलीच चुरस रंगणार आहे. आॅनलाइन प्रक्रियेतून भरण्यात येणाऱ्या अकरावीच्या जागांत यंदा तब्बल १९ हजार ४०० जागांची घट झाली आहे. गेल्या वर्षी मुंबई विभागीय मंडळातून दहावी परीक्षेत एकूण ३ लाख ०३ हजार ०९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यातील २ लाख ६४२ विद्यार्थ्यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी राबवण्यात येणाऱ्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केले होते. त्यांच्यासाठी महानगर क्षेत्रात २ लाख ८९ हजार १७२ जागा उपलब्ध होत्या. त्यामुळे बऱ्याचशा जागा शिल्लक होत्या. याउलट या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ९७ हजार ७१९ इतकी आहे. त्यामुळे या वर्षीही सुमारे २ लाख विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे. मात्र उपलब्ध जागांत घट झाल्याने प्रवेशासाठी चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.>प्रवेश मिळवण्याचे आव्हानसर्वच शाखांच्या जागांमध्ये घट झाल्याने नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे विद्यार्थ्यांसाठी आव्हान ठरणार आहे.>शाखानिहाय उपलब्ध जागाशाखाइनहाउस,उरलेल्या एकूणअल्पसंख्याक,जागाव्यवस्थापनकला१३,५४७२०,६०२३४,१४९विज्ञान३५,१६८४६,६६३८१,८३१वाणिज्य७०,८२३८२,९६९१,५३,७९२एकूण १,१९,५३८१,५०,२३४२६९७७२
आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग
By admin | Published: June 08, 2016 3:42 AM