पंढरपूर (जि़सोलापूर): श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या आॅनलाईन बुकिंगसाठी १०० रुपये भाविकांना मोजावे लागणार आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भाविकांनी सोयी, सुविधा पुरविण्याचा ऐतिहासिक निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गत वर्षात १३ लाख भाविकांनी आॅनलाईन बुकींग करुन विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आहे. आता आॅनलाईन बुकींगसाठी १०० रुपये फी केल्याने मंदिर समितीला आॅनलाईन बुकींग दर्शनातून कोट्यवधी रुपये उत्पन्न मिळणार आहे.
मंदिर समितीच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासमध्ये सहअध्यक्ष ह. भ. प. गहणीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची पहिली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
मंदिर समितीने काही वर्षापूर्वी मंदिर समितीच्या वेबसाईटवर आॅनलाइन दर्शन बुकिंग सुरु केले़ त्यामुळे दर्शन बुकींग करून भाविक त्या वेळेत पंढरपूर नगरीत येत होते. याचा फायदा प्रत्येक ठिकाणच्या इंटरनेट कॅफेला होत होता, मात्र समितीला यातून काहीच उत्पन्न मिळत नव्हते.
मंदिर समितीच्या बैठकीला दोन आमदार व मी स्वत: येऊ शकलो नाही़ बैठकीत आॅनलाइन बुकिंग करून दर्शन घेणाºया भाविकाकडून १०० रुपये घेण्याबाबत फक्त चर्चा झाली आहे. याबाबत मंत्र्यांशी, महाराज मंडळीशी चर्चा करून हा निर्णय घ्यावा लागेल.- डॉ़ अतुल भोसले, अध्यक्ष,श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती