शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

महावितरणची ऑनलाईन सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डची सुविधा राज्यभर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 5:01 PM

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांना कर्मचारी  पोर्टल व डॅशबोर्डच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजासाठी बहुतांश आवश्यक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून त्यामुळे महावितरणचे संपूर्ण कामकाज अधिक प्रभावी व गतीशील होत आहे.

मुंबई -  ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांना कर्मचारी  पोर्टल व डॅशबोर्डच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजासाठी बहुतांश आवश्यक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून त्यामुळे महावितरणचे संपूर्ण कामकाज अधिक प्रभावी व गतीशील होत आहे.डिजिटल महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात आणावयाची असेल तर जास्तीत जास्त सेवा सुविधा ऑनलाईन होणे अत्यावश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र उपयुक्त मोबाईल ॲप यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याशिवाय आता कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज ऑनलाईन करता यावे यासाठी कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डची महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.कर्मचारी पोर्टलमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी सर्व वैयक्तिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. यात पगारपत्रक, आयकर तपशील, पदोन्नती व उच्चवेतनश्रेणीच्या लाभाबाबतची कार्यवाही, विभागीय परीक्षेचा अर्ज व विविध प्रशिक्षणे, भविष्य निर्वाह निधीची माहिती, विविध भत्यांसाठी अर्ज व मंजुरी, रजेचा अर्ज व मंजुरी, शिस्तभंग कारवाईबाबतची माहिती, सेवाज्येष्ठता यादी, बदली विनंती अर्ज इत्यादी सुविधा कर्मचारी पोर्टलमध्ये  उपलब्ध आहेत. या पोर्टलमधून केलेल्या अर्जावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही विहित मुदतीत ऑनलाईन कार्यवाही करावी लागणार आहे. ईलायब्ररीची सोय कर्मचारी पोर्टलमधून करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व महावितरण कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील सर्व प्रशासकीय परिपत्रके, सेवाविनियम उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.  कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्यांची सोडवणूक या पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे. कर्मचारी पोर्टलमध्ये लॉग ईन करताना कर्मचाऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवून पोर्टलच्या सुरक्षित वापरासाठी खातरजमा केली जाते.  कर्मचारी पोर्टलमध्ये कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासंबंधी विविध नोटीफिकेशन्स उपलब्ध होतात. त्याद्वारे उपलब्ध अचूक माहितीच्या आधारे त्वरीत निर्णय घेणे शक्य होते.महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी डॅशबोर्डची महत्वपूर्ण ठरणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यात विविध माहिती ऑनलाईन व एकत्रितपणे उपलब्ध होत आहे. महावितरणच्या वीजग्राहकांची आकडेवारी व यादी, ग्राहकांच्या तक्रारी व त्याचे निवारण, त्यांना देण्यात आलेले वीजबील, ग्राहकांनी केलेला देयकाचा भरणा, जमा झालेली रक्कम, थकबाकी या सर्वांची माहिती व या माहितीचे विश्लेषण महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे महावितरणची दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक व एकसमान उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे विविध विभागातून येणाऱ्या माहितीत त्रुटी राहणार नाही व ती एक समान राहील. त्यामुळे या माहितीवर तात्काळ विचार करून अचूक निर्णय होईल व परिणामी या निर्णयाची प्रभावी अंबलबजावणी करता येईल. डॅशबोर्डवर उपलब्ध माहिती व विश्लेषणाचा उपयोग करून महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयांना आपापल्या कार्यक्षेत्रातील वितरण व वाणिज्यिक हानी, थकबाकी यासह इतर विविध त्रुटींवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यावर परिणामकारक उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे.महावितरणने मागील वर्षांत ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अँपची सुविधा उपलबध करून दिली. या अँपमुळे कामकाजाला गतीशीलता मिळाली आहे. कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्ड या सुविधांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व सुलभ करता येत असून त्याद्वारे ग्राहकांनाही सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध होत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र