शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

तिकीट दरवाढीविरोधात ‘सेव्ह राणीबाग’ची आॅनलाइन याचिका

By admin | Published: May 03, 2017 4:25 AM

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागच्या तिकीटदरात २० पटीने वाढ केल्याच्या विरोधात ‘द सेव्ह राणीबाग

मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागच्या तिकीटदरात २० पटीने वाढ केल्याच्या विरोधात ‘द सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन’ या संस्थेने आॅनलाइन याचिका केली आहे. पालिकेने तिकीट दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, मुंबई महानगरपालिकेने १५० वर्षांपूर्वी उद्यान म्हणून सुरुवात केलेल्या राणीबागेत कालांतराने प्राणिसंग्रहालय सुरू झाले. मात्र, आजही राणीबागेतील ६३ टक्के जागा ही झाडे व बगिच्यांनी व्यापलेली असून केवळ १८ टक्के जागांवर जनावरांचे पिंजरे आहेत. तरीही या ठिकाणी आणलेल्या पेंग्विनचा देखभाल खर्च वसूल व्हावा, म्हणून तिकीट दरात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. केवळ ५ रुपये तिकिटावर राणीबागेत येणाऱ्या प्रौढांना आता यापुढे १०० रुपये, तर २ रुपयांऐवजी लहान मुलांना २५ रुपये मोजावे लागणार आहेत. सर्वसामान्य नागरिक मात्र या तिकीट दरवाढीमुळे राणीच्या बागेला भेट देणे टाळणे पसंत करतील. त्यामुळे त्यांना प्राणिसंग्रहालयासह निसर्गाच्या सान्निध्याचाही अनुभव घेता येणार नाही. फाउंडेशनच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती श्रीकृष्ण, राज्याचे माजी मुख्य सचिव द.म. सुखटणकर, व्ही. रंगनाथन, महापालिकेचे माजी आयुक्त शरद काळे यांनी पाठिंबा देत शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. तरीही अधिकाधिक नागरिकांनी या आॅनलाइन याचिकेद्वारे शुल्कवाढ मागे घेण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे. आॅनलाइन पाठिंबा देणाऱ्यांच्या ई-मेल आयडीची माहिती गुप्त ठेवली जाईल, असेही फाउंडेशनने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)फाउंडेशनच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती श्रीकृष्ण, राज्याचे माजी मुख्य सचिव द.म. सुखटणकर आदींनी पाठिंबा देत शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.