शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

राज्यात आॅनलाइन पोलीस स्टेशन

By admin | Published: September 16, 2015 12:52 AM

पोलीस ठाण्यातील कामकाज पेपरलेस आणि आॅनलाइन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘क्राइम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क

नागपूर : पोलीस ठाण्यातील कामकाज पेपरलेस आणि आॅनलाइन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘क्राइम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम’ (सीसीटीएनएस) प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते गुरुवारी झाला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.राज्यातील पोलीस दलाला आधुनिक करण्यासोबतच दर्जात्मक सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. सीसीटीएनएस हा त्याचाच एक भाग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यापुढेही महाराष्ट्र पोलीस दलाला ‘डिजिटलयाझेशन’कडे झपाट्याने वाटचाल करायची आहे. मात्र, या आधुनिकतेला लोकाभिमुखतेची जोड असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोकांना पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारायला लावण्यापेक्षा घरबसल्या त्यांना परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळाले तर नागरिकांचा त्रास वाचेल आणि पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही वाढेलराज्यातील स्मार्ट सिटी केवळ स्मार्टच नव्हे, तर सेफसुद्धा बनाव्यात, असा आपला मानस आहे. सीसीटीव्हीच्या नजरेत असलेले पुणे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात पहिले शहर ठरले आहे. काही दिवसांतच मुंबईच्या पहिल्या झोनचे काम पूर्णत्वास येणार असून, पुढच्या काही महिन्यांत राज्यातील सर्व मोठ्या शहरांत सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.काय आहे सीसीटीएनएस?प्रारंभी पोलीस महासंचालक दयाल म्हणाले की, या प्रणालीमुळे राज्यातील १०४१ पोलीस ठाणे तसेच ६३८ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये संलग्न झालीत. एका क्लिकमध्ये विशिष्ट वर्गातील गुन्हेगाराची माहिती उपलब्ध होणार आहे.