पुणो : चोरीच्या दुचाकींची ओएलएक्स संकेतस्थळावर जाहिरात देऊन त्यांची विक्री करणा:या तिघांना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिरुद्ध पाठक यांनी आरोपींना 23 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
अयमन मुख्तार जमादार (25, रा. कोंढवा), फहीम अब्दुल अजिज मापकर (27, रा. महाड, जि. रायगड) आणि युसूफ इस्माईल गोलंदाज (24, रा. पाचगणी, महाबळेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत.
साहाय्यक फौजदार एम. आर. थोरात यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपींकडून पाच दुचाकी, प्रिंटर, मॉनिटर, सात मोबाइल हँडसेट, क्रेडिट व डेबिट कार्ड असा ऐवज जप्त केला आहे. आरोपी रायगड व सातारा जिल्ह्यांतून दुचाकींची चोरी करून संकेतस्थळावर जाहिरात देऊन त्यांची विक्री करीत होते. त्यासाठी दुचाकींचे बनावट नावाने स्मार्ट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, आरटीओकडील गाडय़ा ट्रान्स्फरचे फॉर्म आदी सर्व बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची विक्री करीत होते. त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करणो आणि फसवणूक करणो असे गुन्हे दाखल झाला आहे.
स्मार्टकार्ड व वाहन चालविण्याचा बनावट परवाना तयार करण्यासाठी आरोपींनी चीनमधून पीव्हीसी कार्ड मागितले आहे, याबाबत तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील गौरी लकडे यांनी केली. ओएलएक्स संकेतस्थळावर कशी जाहिरात दिली जाते, याचा तपास करावयाचा असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)
च्फरासखाना व विश्रमबाग पोलीस ठाण्याच्या आवारातील बॉम्बस्फोटात वापरलेल्या दुचाकीची सातारा येथून चोरी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने बॉम्बस्फोटातील आरोपींशी अटक केलेल्या आरोपींचा काही संबंध आहे काय, याबाबत पोलीस तपास करणार आहे.
नगरमध्ये दुचाकी चोर जेरबंद
अहमदनगर : शहरातून दुचाकी चोरणारी पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी जेरबंद केली. त्यांच्याकडून 2क् दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पारनेरमधील भाळवणी परिसरात दुचाकी चोरणा:या टोळीचा पोलीसांना सुगावा लागला. एकाला पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी अंती सर्वाना त्यांना जेरबंद केले.