नागरी (रेल्वे) (चंद्रपूर) : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने सातबारा आॅनलाइन देण्यास सुरुवात केली. मात्र विविध कारणांमुळे आॅनलाइन प्रकियेमध्ये समस्या येत आहेत. त्यामुळे आॅनलाइन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरत आहे.महाराष्ट्र शासन व टाटा कन्सलटन्सी यांच्या संयुक्त उपक्रमातून महाआॅनलाइनमार्फत महा-ई सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. यामध्ये महसूल विभागातील विविध कामे केली जातात. मात्र आॅनलाइनच्या माध्यमातून सातबारा काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आॅनलाइनद्वारे सातबारावर असलेली नोंद सन २०१३ पर्यंतच अद्ययावत केलेली आहे. तसेच शेतकऱ्याची भोगवटा नोंद, फेरफार नोंद, पीकपेरा नोंद, बँक बोजा यासंदर्भात कोणतीही अद्ययावत माहिती उपलब्घ नाही. यामुळे शेतकऱ्यांना सातबारा काढताना अनेक कटकटींना तोंड द्यावे लागत आहे. (वार्ताहर)हस्तलिखित बंदसध्या शासनस्तरावर डिजिटायझेशनचे काम सुरू आहे. शासनाच्या महाभूलेख या आज्ञावलीमध्ये आॅनलाइन सातबारा नोंदणी संबंधाने शासनाने तहसील कार्यालयामध्ये नोंदणी कक्ष चालू केले आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयातून मिळणारा हस्तलिखित सातबारा देणे बंद करण्यात आले आहे.
आॅनलाइन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
By admin | Published: October 27, 2016 1:17 AM