मुंबई : ग्राहकांशी आॅनलाइन संपर्क साधून वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच मुलींची सुटका करत पाच जणांना बेड्या ठोकल्या. एका वेबसाइटवर आॅनलाइन जाहिरात देऊन हा वेश्याव्यवसाय सुरू होता. त्यावरील नंबरवर फोन केल्यानंतर मुंबईतील हॉटेलांत वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविण्यात येत होत्या. याची माहिती मिळताच समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी बनावट गिऱ्हाईके पाठवून याची खात्री केली. त्यानंतर पवई परिसरातील रिलॅक्स इन हॉटेल, सनसृष्टी कॉॅम्प्लेक्स, गुरूकृपा हॉटेलजवळ, तुंगा गाव, साकी विहार रोड परिसरात रात्री सापळे रचून पाच दलालांसह वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पाच मुलींना ताब्यात घेतले. मुलींची रवानगी महिला सुधारगृहात केली असून पाच दलालांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आॅनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पाच दलालांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 2:54 AM