शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

आॅनलाईन फोडला एमपीएससीचा पेपर

By admin | Published: August 30, 2016 9:31 PM

रविवारी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या स्टाईलने ‘आॅनलाईन’ प्रश्नपत्रिका फोडून पेपर

ऑनलाइन लोकमत
 
औरंगाबाद, दि.30 -  रविवारी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या स्टाईलने ‘आॅनलाईन’ प्रश्नपत्रिका फोडून पेपर सोडविणा-या टोळीचा सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. वर्घा येथे परीक्षा देणाºया आपल्या साथिदाराला हे आरोपी औरंगाबादेत बसून उत्तरे सांगत होते.
या टोळीतील परीक्षार्थी विठ्ठल धनसिंग घोलवाल (२३, रा. हसनाबादवाडी, ता. औरंगाबाद) याच्यासह संदीप धनसिंग घोलवाल (२०,हसनाबादवाडी), लखनसिंग देवीचंद देडवाल (२०, रा. हसनाबादवाडी), अनिल ऊर्फ अरुण केसरसिंग जोनवाल (२४, रा. लांडकवाडी, ता. औरंगाबाद) व घाटी रुग्णालयातील  कारकून मदन बमनाथ या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, घाटी रुग्णालयात कारकून असलेल्या आरोपी मदनने २६ आॅगस्ट रोजी तेथील डॉ. विकास राठोड यांचा लॉपटॉप नेला. ‘मझ्या मुलीला शाळेचा प्रोजेक्ट बनवून द्यायचा आहे, त्यासाठी लॅपटॉप हवा आहे’ अशी त्याने थाप मारली. २८ आॅगस्ट रोजी मदनने सायंकाळी लॅपटॉप आणून दिला. 
लॅपटॉपवर प्रश्नपत्रिका पाहून आला संशय
मदनने लॅपटॉप परत आणून दिल्यानंतर डॉ. राठोड यांनी लॅपटॉप सुरू केला आणि आपले काम सुरू केले. तेव्हा त्यांना आपल्या लॅपटॉपमध्ये सकाळीच झालेल्या एमपीएसची परीक्षेची प्रश्नपत्रिका दिसून आली. तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी मदनला विचारणा केली. त्यावर त्याने दिलेल्या गोलमाल उत्तरामुळे डॉ. राठोड यांना संशय आला. लॅपटॉप नेऊन मदनने काही तरी घोळ केला, असे लक्षात येताच उद्या काही झाले तर आपण अडचणीत येऊ शकतो, याची चाहूल डॉ. राठोड यांना लागली आणि त्यांनी थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी सायबर गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविले. सायबर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेश थिटे, फौजदार हेमंत तोडकर, निधीन आंधळे यांनी केलेल्या तपासात ‘एमपीएससी’ चा पेपर फोडून कॉपी करणारे हे रॅकेटच समोर आले. त्यावरून सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी शोध घेऊन या टोळीतील पाचही आरोपींना अटक केली. आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 
परीक्षार्थी वर्ध्यात...उत्तरे औरंगाबादेतून!
यातील आरोपी विठ्ठल, अनिल, लखनसिंग, संदीप हे चौघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. हडकोतील नवजीवन कॉलनीत ते चौघे गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होते. यातील आरोपी विठ्ठल हा रविवारी झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेला बसला होता. वर्घ्यातील परीक्षा केंद्रावर त्याचा नंबर लागलेला होता.  हे सर्व आरोपी ऐकमेकांचे नातेवाईक आहेत. विठ्ठलला पास करण्यासाठी सर्वांनी मिळून गाजलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपट स्टाईलचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आरोपी मदनने मग डॉ. राठोड यांच्याकडून उसना लॅपटॉप आणला. तर आरोपी अनिल जोनवालने ब्ल्यू ट्यूथ व इतर साहित्याची जुळवाजुळव केली. मग ठरल्याप्रमाणे आरोपी विठ्ठल हा परीक्षा देण्यासाठी वर्धा येथे गेला. रविवारी परीक्षा केंद्रात बसल्यानंतर प्रश्नपत्रिका हाती मिळताच त्याने स्पाय कॅमेºयाच्या सहायाने तिचे छायाचित्र काढून ते इकडे औरंगाबादेत बसलेल्या आपल्या मित्रांना मेलवर पाठविली. इकडे मेलवर प्रश्नपत्रिका मिळताच हडकोतील नवजीवन कॉलनीत खोलीत बसलेल्या अनिल, लखनसिंग, संदीप व मदनने गाईड, पुस्तकात पाहून वर्धा परीक्षा केंद्रात बसलेल्या विठ्ठलला उत्तरे सांगण्यास सुरूवात केली. आरोपींनी सगळीच्या सगळी उत्तरे त्याला ब्ल्यू ट्युथने कळविली. अशा पद्धतीने आरोपींनी प्रश्न पत्रिका फोडून कॉपी केल्याचे सायबरच्या तपासात स्पष्ट झाले.