नवी दिल्ली : देशात होणा:या ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे.एप्रिल महिन्यात ऑनलाईन रेल्वे बुकिंग एक कोटीच्या पुढे गेले आहे तसेच विमान प्रवासाची तिकिटे ऑनलाईन बुक करण्याकडे कल वाढलेला दिसून येत आहे.
इंटरनेटन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया(आयएएमएआय)आणि इंडियन मार्केट रिसर्च ब्युरो (आयएमआरबी) यांनी महिनाभर इंटरनेटवर होणा:या विविध हालचालींचा वेध घेऊन त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामधून ही बाब उजेडात आली आहे. एप्रिल महिन्यात झालेले रेल्वेच्या तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग एक कोटी 32 लाखांहून अधिक आहे. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यातील बुकिंगशी (4क् लाख) त्याची तुलना करता त्यामध्ये 231 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणो विमान तिकिटांचे बुकिंगही ऑनलाईन करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. सन 2क्13च्या एप्रिल महिन्यामध्ये 78 लाख तिकिटांची ऑनलाईन विक्री झाली होती. यावर्षी ही विक्री 1.78 दशलक्षांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ विमान तिकिटांच्या विक्रीमधील वार्षिक वाढ 11क् टक्के एवढी झाली आहे.
विविध संकेतस्थळांना भेटी देणा:यांची माहिती आयएएमएआयने वेब ऑडियन्स मेजरमेंटच्या माध्यमातून संकलित केली आहे. त्यातून अतिशय नवीन माहितीही समोर आली आहे. चालू वर्षीच्या एप्रिल महिन्यात 3क् लाख 27 हजार रिङयुम विविध संकेतस्थळांवर दाखल करण्यात आले. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत (1क्लाख 6 हजार) त्यामध्ये 2क्8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)