शहरं
Join us  
Trending Stories
1
कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
2
पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
3
"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"
4
ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला
5
"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान
6
महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
8
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद
9
कोणती अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची बातमी येईल; 'चॅम्पियन' खेळाडू नव्या इनिंगसाठी सज्ज
10
वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
11
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी बाबा साकार हरींच्या वकिलाने केला नवा दावा, म्हणाले, ‘’विषारी स्प्रेमुळे…’’
12
"लालूंनी गळ्यात नितीश कुमारांच्या फोटोचं लॉकेट घातलं पाहिजे..."; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
13
"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले, त्याचे परिणामही भोगले", पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य
14
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा उद्या शपथविधी
15
सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक
16
शरद पवारांनी सांगितला रशियन महिलेचा किस्सा, नाव न घेता अजितदादांवर साधला निशाणा
17
ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस
18
"रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही…’’, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मोठी भविष्यवाणी  
19
PHOTOS : सूर्या-देविशाच्या लग्नाचा वाढदिवस; जोडप्याने रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
20
श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...

केवळ ११ नगरसेवकांना राजकीय पदोन्नती

By admin | Published: June 07, 2016 7:43 AM

स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट ठाण्यात केवळ ११ नगरसेवकांनाच राजकीय पदोन्नती देऊन आमदार, खासदार, मंत्रीपदापर्यंत घेऊन गेली

नामदेव पाषाणकर,

घोडबंदर- स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट ठाण्यात केवळ ११ नगरसेवकांनाच राजकीय पदोन्नती देऊन आमदार, खासदार, मंत्रीपदापर्यंत घेऊन गेली. त्यामध्ये विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे, वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांचा समावेश आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक झालेल्या अनेकांना त्यांचा वॉर्ड राखीव झाल्याने किंवा पराभव झाल्याने पुन्हा राजकारणात डोके वर काढता येत नाही. परिणामी आमदार, खासदार, मंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न तेथेच बेचिराख होते. माजी नगरसेवक म्हणूनच त्यांना अखेरपर्यंत मिरवावे लागते. ठाण्यातील चार महापौर, एक उपमहापौर, दोन सभागृह नेते, एक स्थायी समिती सभापती आणि एक विरोधी पक्षनेता यांच्या गळ्यात सतत राजकीय पदोन्नतीच्या माळा पडत गेल्या. ठामपाच्या आठ नगरसेवकांना विधानसभा निवडणूक लढवण्याचे भाग्य लाभले. परंतु त्यांच्या नशिबी उच्च श्रेणीचा राजयोग नसल्याने ते ठाण्याच्या तलावातील राजकारणाबाहेर पडू शकले नाहीत.ठाणे महापालिकेची स्थापना १९८६ मध्ये झाल्यानंतर प्रथम महापौर होण्याचा बहुमान लाभलेले सतीश प्रधान यांना राज्यसभेच्या खासदार पदापर्यंत मजल मारता आली. वसंत डावखरे हे १९८७ मध्ये महापौर झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ठाणे विधान परिषदेवर चार वेळा आमदार म्हणून ते निवडून गेले आणि विधान परिषदेचे उपसभापती म्हणून दीर्घकाळ लाल दिवा डोक्यावर मिरवत राहिले. १९९३ ते १९९६ या कालावधीत तीनदा महापौर झालेले अनंत तरे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याने त्यांच्या कपाळावरील नाम महाराष्ट्रभर परिचित झाला. २००५ ते २००७ या कालावधीत महापौर झालेले राजन विचारे हे आमदार आणि विद्यमान खासदार आहेत. त्याचप्रमाणे १९८६ मध्ये उपमहापौर झालेले सिताराम भोईर यांनाही आमदारकीचे पंख लाभले. १९८६-८७ दरम्यान सभागृह नेते राहिलेले प्रकाश परांजपे हे तीनवेळा खासदार होते. २००१ ते २००५ असे पाच वर्षे सभागृह नेते म्हणून काम केलेले एकनाथ शिंदे सध्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री आहेत. नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रताप सरनाईक हे दोनदा आमदार झाले. विरोधी पक्षनेते असलेले सुभाष भोईर सध्या आमदार आहेत.पराभवाने हुकला उच्च राजयोग नगरसेवक असताना किंवा मुदत संपल्यावर विधानसभा निवडणूक लढण्याची संधी लाभलेल्या. परंतु पराभव झालेल्यांमध्ये मनोज शिंदे, दशरथ पाटील, देवराम भोईर, अशोक राऊळ, हणमंत जगदाळे, राजन किणे, सुधाकर चव्हाण, मालती भोईर या आठजणांचा समावेश आहे.आमदारकीची प्रबळ इच्छा माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, अशोक वैती, माजी स्थायी समिती सभापती गोपाळ लांडगे व नरेश म्हस्के यांची आमदार होण्याची इच्छा दीर्घकाळ अपूर्ण आहे. आपल्या नशिबाचे फाटक कधी उघडते याची ते वाट पाहत आहेत.