शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

मराठवाड्यात केवळ ७० टक्के पाऊस : देशात १०१ टक्के बरसला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 1:09 PM

सर्व भाकीते मॉन्सूनने यंदा मोडीत काढली असून देशभरात आतापर्यंत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडला आहे़.

ठळक मुद्देवितरण मात्र विषम : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात यंदा तुफान पाऊस कोसळला़ पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या २ सप्टेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यतेमुळेविदर्भातील फक्त गडचिरोली जिल्ह्यात सरासरीच्या २४ टक्के पाऊस जादा

पुणे : पावसाळ्यातील तीन महिने संपत असताना मराठवाड्यात केवळ ६९ टक्के पाऊस पडला असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे़. एलनिनोमुळे यंदा भारतात मॉन्सूनला मोठा फरक पडण्याची शक्यता असल्याची परदेशातील अनेक हवामान विभागांनी भाकीत व्यक्त केली होती़. सर्व भाकीते मॉन्सूनने यंदा मोडीत काढली असून देशभरात आतापर्यंत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडला आहे़. मात्र, त्याचे वितरण नेहमीप्रमाणे विषम राहिले असून ३६ पैकी ११ हवामान विभागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़.

भारतीय हवामान विभागाने यंदा मॉन्सूनचा पाऊस ९६ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. सुधारित अंदाजातही त्यांनी पावसाचे अनुमान समाधानकारक असल्याचे म्हटले होते़. त्यानुसार आता तीन महिने पूर्ण होत असताना देशात सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झाला आहे़. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात यंदा तुफान पाऊस कोसळला़. कोकणात सरासरीपेक्षा ३३ टक्के तर मध्य महाराष्ट्रात तब्बल ५४ टक्के पाऊस जादा झाला आहे़. त्याचवेळी मराठवाड्यावर मॉन्सूनने वक्रदृष्टी ठेवली आहे़. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे़. सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाला असून विदर्भात ४ टक्के पाऊस कमी झाला आहे़.  देशभरातील २२ हवामान विभागात सर्वसाधारण पाऊस झाला असून हे देशातील एकूण क्षेत्रफळापैकी ६९ टक्के भुभाग व्यापते़ तर देशाचा १७ टक्के भुभाग असलेल्या ७ विभागात सरासरीच्या १२० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ तर १४ टक्के भुभागावरील ७ हवामान विभागात अत्यंत कमी पाऊस झाला़. ़़़़़़़़़़

मराठवाड्यातील औरंगाबाद -१८, बीड -४३, हिंगोली -३०, लातूर -३३, जालना -३३, नांदेड -१९, उस्मानाबाद - २६, परभणी -३९ टक्के पाऊस कमी झाला आहे़. विदभार्तील यवतमाळ -३६, वाशिम - ३२, गोंदिया - १७ टक्के पाऊस कमी झाला आहे़. विदर्भातील फक्त गडचिरोली जिल्ह्यात सरासरीच्या २४ टक्के पाऊस जादा झाला आहे़. ़़़़़़़

पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या २ सप्टेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यतेमुळे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि विदर्भात पुढील आठवड्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे़.़़़़़़ 

टॅग्स :PuneपुणेMarathwadaमराठवाडाRainपाऊसdroughtदुष्काळVidarbhaविदर्भ