शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

Nitin Gadkari: फक्त आठ इंचाचा कोट अन् खड्डेमुक्त महाराष्ट्र होईल; नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 9:07 PM

Nitin Gadkari in Nashik: ठाणे-मुंबई रस्ता फारच खराब आहे. याचे तातडीनं इंस्पेक्शन करण्याचे आदेश दिलेत असेही ग़डकरी म्हणाले.

आपल्या देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात. 3 लाख लोकं यात ग्रस्त होतात. 50 टक्के अपघात कमी होण्यासाठी तामिळनाडू सह अनेक राज्यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात मात्र अद्याप यश नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नाशिकमधील फ्लायओव्हरच्या डिझाइनमध्ये चुका झाल्यानं 100 लोकं मृत्युमुखी गेल्याचं मला दुःख असल्याचे ते म्हणाले. (Nitin Gadkari in Nashik. Inauguration and Foundation Stone Laying Ceremony of 206 KM long 12 NH Projects worth Rs. 1678 Cr. in Nashik, Maharashtra )

सर्व कार मध्ये 6 एअर बॅग्स कम्पलसरी केल्या आहेत. झिरो अपघात होण्यासाठी ठाणे आणि नाशिकात कमिटी स्थापन करणार. मात्र मलाही मेट्रोच्या आवाजाचा त्रास होतो, अनेकांना होतो यामुळे मेट्रोला, साउंड बॅरियर्स लावायला सांगितले आहे.  नाशिकचं पर्यावरण खूप चांगलं आहे.  विकास होतोय, हे वातावरण खराब होऊ शकतं. पुण्यातील परिस्थिती फारच खराब आहे. नाशिक मधील गोडाऊन, हायवेवर शिफ्ट करा, मी मदत करायला तयार आहे, असेही गडकरी म्हणाले. 

नाशिकरोड ते द्वारका हा मेट्रो रूटवर डबलडेकर 2 लेन फ्लायओव्हर मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी 1600 कोटी मंजूर केले आहेत. 2 वर्षात याच्या उदघाटनासाठी मी येणार असल्य़ाची घोषणाही गडकरींनी केली.  ठाणे-मुंबई रस्ता फारच खराब आहे. याचे तातडीनं इंस्पेक्शन करण्याचे आदेश दिलेत असेही ग़डकरी म्हणाले. समृद्धी महामार्गाला जोडला जाणारा रस्ता तयार करणार, त्यासाठी 5 हजार कोटींच्या रस्त्याला मंजुरी देण्यात आल्याचे ते म्हणाले. 

दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे हा नाशिकमधून 122 किमी जातो. 16 कोटी रुपये एका एकराला मागणी आहे, ती कमी करावी अशी राज्य सरकारला विनंती करत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना पैसे मिळावे ही माझी इच्छा आहे. या रस्त्याचा शेतकऱ्यांना, उद्योगांना मोठा फायदा होणार. पेठ आणि सुरगाणा या तालुक्यात विकासाची मोठी संधी आहे असेही गडकरी म्हणाले. 

खड्डेमुक्त महाराष्ट्ररस्त्यावर 8 इंचाचे व्हाइट टोपिंग केलं तर खड्डे पडणार नाहीत. राज्य सरकारनेही हा प्रयोग करावा, असा सल्ला गडकरींनी दिला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यात सहमती न झाल्यानं समुद्राला पाणी जातंय. 2 राज्यात मी मध्यस्थी करायला तयार असल्याचे देखील गडकरी म्हणाले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNashikनाशिक