मुंबई : तुमचा ध्यास हाच तुमचा पेशा असेल तरच तुम्ही त्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थानी विराजमान होऊ शकता. स्वत:ला कामात पूर्ण झोकून दिल्यास कामाचाही आनंद उपभोगता येतो, असा यशस्वी जगण्याचा मूलमंत्र ब्रिगेडीयर सुशील बसीन यांनी शनिवारी राष्ट्रीय आॅनलाइन निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात उपस्थित शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. यलो टॉक या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी १० ते ३० सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली होती. ‘पॉवर आॅफ अनकन्व्हेंन्शनल थिंकिंग- द माइंड दॅट ब्रॅन्चेस आऊट’ या विषयावर देशभरातील विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन पद्धतीने निबंध मागवण्यात आले होते. माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशनच्या सभागृहात उत्साही वातावरणात त्याचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. त्यात ब्रिगेडीयर बसिन म्हणाले, ध्येय आणि आपली ऊर्जा यांची सांगड घालता आली तरच आयुष्यात यशस्वी होता येते. आर्यमन दर्डाची छापदेशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेली आॅनलाइन निबंध स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. त्यात आठवी ते दहावी या (गु्रप-२) या गटात आर्यमन देवेंद्र दर्डा याने विजेतेपद मिळविले. आर्यमन हा येथील एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना एकूण ५ बक्षिसे मिळाली आहेत. स्पर्धेतील तिन्ही गटांत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचा गटवार निकालअनुक्रमे पहिले पाच विजेते व शाळेचे नावगट - १ (पाचवी ते सातवी) : जयती नागोरी - (चिल्ड्रन्स अॅकॅडमी, मुंबई ), श्रेया पटेल - (चिल्ड्रन्स अॅकॅडमी, मुंबई), श्रेया टंडन - (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), सिद्धान्त शर्मा - (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), निहीरा नामजोशी - ठाकूर इंटरनॅशनल स्कूल (सीआयई), मुंबई) गट - २ (आठवी ते दहावी) : आर्यमन देवेंद्र दर्डा - (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), समीक्षा पुरी - (डीएव्ही पब्लिक स्कूल, नवी दिल्ली), अनन्या सक्सेना - (चिल्ड्रन्स अॅकॅडमी, मुंबई), वंशिका झवेरी - (सेंट जॉर्ज हायस्कूल, मुंबई), शोबित सिंग - (जीया लाल मित्तल डीएव्ही पब्लिक स्कूल, गुरुदासपूर)गट -३ (अकरावी ते बारावी) : रोहित के.आर. - (एस.बी.ओ. ए स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, चेन्नई), रौल गुलरजानी - (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), सुयोग बुभाटे- (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), ज्योती शर्मा - (केडीव्ही पब्लिक स्कूल, गाझियाबाद), बद्री नारायणन - (शिक्षा केंद्र स्कूल, वेल्लोरी)मान्यवरांची उपस्थितीब्रिगेडियर बसीन यांच्यासह विविध मान्यवरांनी यशस्वीतेचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. सामाजिक कार्यकर्त्या इंद्राणी मलकानी, प्रोफेसर नागार्जुन, विनायक देशपांडे, डॉ. शंकर दास, मिरियन मेनाचेरी, अखिल आर्यन, विवेक शुक्ला हे नामवंत वक्ते तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने सोहळ्यास उपस्थित होते.
ध्यास व पेशा एकच असेल तरच सर्वोच्च यश आवाक्यात
By admin | Published: October 11, 2015 2:27 AM