शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

‘तेरणा’त उरला फक्त मृत जलसाठा!

By admin | Published: April 23, 2016 4:05 AM

उस्मानाबादसह तेर, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या चार गावांची तहान भागविणाऱ्या तेरणा धरणातील जलसाठ्याने मागील तीन वर्षांत एकदाही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी गाठलेली नाही

सुमेध वाघमारे ,  तेर (उस्मानाबाद)उस्मानाबादसह तेर, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या चार गावांची तहान भागविणाऱ्या तेरणा धरणातील जलसाठ्याने मागील तीन वर्षांत एकदाही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी गाठलेली नाही. गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे या धरणात आजघडीला केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चारही गावांची तहान सध्या टँकरवरच भागत आहे. जवळपास २२ हजार लोकसंख्येच्या तेरमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांचा चारा, रोजगार हे प्रश्नही गंभीर बनले आहेत. गावात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या २०३ विहिरी आणि २८२ बोअरवेल असले तरी यातील ८० टक्के स्रोत आटले आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या वतीने ३ टँकर व ४ अधिग्रहीत बोअरवरून पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुराच ठरत आहे. शिवाय गावात ग्रामपंचायतीच्या १२पैकी ७ स्रोत सुरू असून, मध्यंतरी लोकसहभागातून बोअर घेतल्यामुळे काही भागांतील रहिवाशांना दिलासा मिळाला. परंतु, गोदावरी भाग, पेठ, बसस्टँड परिसर, पूर्व भीमनगर, मातंग वस्ती, विठ्ठलनगर, अंजनानगर या भागाला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तेरमध्ये १६९६ नोंदणीकृत मजूर असून, त्यांनाही मजुरीसाठी भटकंती करावी लागत आहे. येथे विहीर पुनर्भरणाच्या कामावर केवळ ७ मजूर उपस्थित असून, इतर मजूर मिळेल त्या कामावर समाधान मानत आहेत. चारा छावणीमुळेमिळाला दिलासातेर येथे एकूण १६१८ पशुधन आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गहन होत असतानाच येथे चारा छावणी सुरू झाल्यामुळे पशुपालकांची ही चिंता काही प्रमाणात दूर झाली.तेरमध्येही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु, ही तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सरपंच सुवर्णा माळी यांनी सांगितले.तेरमध्ये मजुरांची संख्याही मोठी आहे. परंतु, रोजगाराअभावी कुणाचीही उपासमार होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मागेल त्याच्या हाताला काम देण्याचे प्रयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे म्हणाले.> ‘दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून देऊ’विटा (जि. सांगली) : राज्यातील ९८ जलसिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली असून, सर्व योजना पूर्ण करण्यासाठी अजून ९० हजार कोटींची आवश्यकता आहे. कर्जरोखे, कर्ज काढून हा निधी उपलब्ध करणार असून, भाजपाचे सरकार सत्तेच्या उर्वरित कालावधीत राज्यातील ८० टक्के जलसिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहे, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलसंपदामंत्री महाजन यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. पाण्याची ८० ते ९० टक्के गळती होत आहे. ती रोखण्यासाठी यापुढील काळात पाइपबंद पाणी योजनांना मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उपलब्ध पाण्यात सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. आम्हाला २०१७ची अंतिम मुदत देण्यात आली असून, टेंभू योजनेवरील सर्व सिंचन क्षेत्र ठिबकच्या माध्यमातून सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. उपसा सिंचनाला प्राधान्य देण्यात येणार असले तरी ठिबकच्या वापरासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता ठेवली पाहिजे, असे सांगून दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून देऊ, असेही महाजन म्हणाले. (वार्ताहर)