मुंबई : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावा म्हणून अकरावीची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेची दुसरी विशेष फेरी मुंबई शिक्षण उपसंचालक विभागातर्फे राबविण्यात आली. पण, अजूनही दीड हजार विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. या फेरीत फक्त ६१९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचे शिक्षण उपसंचालक विभागाने सांगितले.शिक्षण उपसंचालक विभागाने दुसºया विशेष फेरीत जाहीर केलेल्या यादीत ६१९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. ११ सप्टेंबरपर्यंत या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे.अजूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांविषयी कोणती प्रक्रिया राबवण्यात येणार, याविषयी शिक्षण उपसंचालक विभागाने घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता प्रवेश न मिळालेल्या दीड हजार विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत आहेत.
दीड हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाविना,फक्त ६१९ विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 4:37 AM