वर्ष 1936-37 : प्रांतिक स्वायत्तता कायद्यानंतरच्या उत्तर भारतातील निवडणुका. काँग्रेस पक्षाचे प्रचार समन्वयक होते कै. लालबहादूर शास्त्नी. कै. पंडित नेहरू यांच्या उत्तर प्रदेशातील सभांच्या नियोजनाची जबाबदारीही कै. लालबहादूर शास्त्नी यांच्यावरच होती. प्रचाराचं काम संपल्यावर रात्नी शिरस्त्यानुसार कार्यकत्र्याचं चहापाणी उरकलं. त्याचं एकूण बिल झालं अडीच रु पये. शास्त्नींच्या खिशात पैसेच नव्हते. नेहरूंच्या खिशातही झाडून झटकून जेमतेम सव्वा रु पया निघाला. मग काय, दादाबाबा करून हात जोडून त्या दमडय़ा कशाबशा धाबामालकाच्या हातावर ठेवून मंडळी पुढच्या प्रचाराला रवाना झाली.
वर्ष 195क् : क:हाड लोकसभा मतदारसंघ. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी लढवलेली निवडणूक. यशवंतरावांविरुद्ध शेकापचे केशवराव पवार लढत होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी अवघा महाराष्ट्र पेटलेला. याच कळीच्या मुद्दय़ाला धरून सगळा प्रचार. अभ्यासपूर्ण आणि संयत यशवंत वाणीला छेद देत धारदार केशव वक्तव्य. परिणाम केशवराव पवार केवळ एकशे आठ मतांनी पराभूत. पण यशवंतराव हवेत गेले नाहीत. लगोलग दुस:या दिवशी ते स्वत:हून केशवराव पवारांच्या घरी गेले. केशवरावांच्या आईच्या पाया पडले. त्यांचाही आशीर्वाद घेतला.
वर्ष 1952 : भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका. प्रगती आणि गती या मुद्दय़ाला धरूनच प्रचार. प्रथमच देशभर लोकसभा व विधानसभांसाठी वयस्क मतदानाच्या अधिकाराचा वापर. कोटय़वधी भारतीयांचे आत्यंतिक उत्साहात मतदान. देशाच्या पहिल्या चार निवडणुकांत, विधानसभा आणि लोकसभासाठीच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या. ‘अरे ला कारे’ न करता प्रचार. त्यामुळे विरोधी बाकांवरही मातब्बर मंडळी. चुकीच्या निर्णयांना चाप. परखड विरोध. निर्भय वावर. हे सगळेच नव्या निवडणूक प्रचाराने मारून टाकले. नवी ‘द्या आणि घ्या’ पद्धत रु जवली. किंबहुना प्रघात म्हणून अंगवळणी पाडली. या सगळ्याचा प्रत्यय इंदिरापर्वात विशेष जाणवला !
नरेंद्र मोदी : आमच्या देशाचे विद्यमान पंतप्रधान. तुफानी लाट होऊन मतदारांना सामोरे आले. आठवतं का बघा, गुजरात विधानसभा निवडणूक. केशुभाई पटेल यांनी बंड करून स्वतंत्न पक्ष स्थापन केला. मोदींना आव्हान दिले. मात्न निवडणुकीत केशुभाईंचा पार धुव्वा उडाला. मोदी हे गुजरातचे पुन्हा मुख्यमंत्नी झाले. मुख्यमंत्नी झाल्या झाल्या मोदी आधी केशुभाईंकडे गेले. त्यांच्या पाया पडले, आशीर्वाद घेतला.
वर्ष 1967 : लोकसभा निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला, घडवला गेला. दस्तूरखुद्द इंदिरा गांधींना दगड मारला गेला. प्रचाराची पातळी एकदमच घसरली. तोच वसा आजही आणि त्याहीपेक्षा खाली घसरून चालवला जात आहे. उदाहरण. सत्तेचाळीस-अठ्ठेचाळीस वर्षापेक्षा जास्तीचा सक्रिय सत्तानुभव. भूकंपनीय राजकीय बुद्धी म्हणूनच कदाचित अधिक ख्यातकीर्त.
शरद पवार : संयमाने बोलण्याचा यशवंतरावांचा वसा. पवारसाहेबांसारख्या अभ्यासू, सर्वव्यासंगी आणि अनेकार्थाने समाजाभिमुख अशा या नेत्याने, बोटावरची मतदान केल्याची शाई पुसून दोनदा मतदान करण्याचा सल्ला भर सभेत दिला. आता यावर त्यांचं म्हणणं आहे, की ते उपरोधानं होतं. असेल, पण या देशातल्या पवारसाहेबांसारख्याच नेत्यांनी तमाम राजकारणाचं उपरोधी वागणं लोकांच्या आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या अंगवळणी पाडलंय का ?
6/क्1/1975 : मुंबई प्रजासमाजवादी पक्षाची बंडखोरी. संयुक्त महाराष्ट्र हाच निवडणुकीचा मुद्दा. लालबागच्या सभेत आचार्य अत्ने गर्जत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात जास्तीत जास्त त्याग लालबागच्या कामगारांनी केला आहे. एकशे पाच हुतात्म्यांपैकी बावीस हुतात्मे लालबागचे आहेत. महाराष्ट्राची मुंबई महाराष्ट्राला दिली असती तर गंगा आटली असती का कुतुबमिनार कोसळला असता, का हिमालय थिजला असता? या काँग्रेसवाल्यांना जनमताची किंमत राहिली नाही. द्विभाषिक राज्य उलथून पाडणो हेच आमचे एकमेव ध्येय! घोषणा आचार्य अत्ने यांची होती. परिणाम समोर आहेत.
-राजेंद्र शिखरे