सुशांत मोरे , मुंबईगेल्या ६0 वर्षांपासून अधिक काळ एसटी महामंडळ महाराष्ट्रातील जनतेला सेवा देत असतानाच कालांतराने या सेवेत बदल होणे अपेक्षित होते. मात्र, ठोस निर्णयांचा अभाव, अंमलबजावणी करण्यात होत असलेली दिरंगाई आणि कागदी घोडेच नाचवण्यात येत असल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांत तब्बल १२ विविध कार्यवाही झालेल्या नाहीत. नुसतीच ‘चाय पे चर्चा’सुरू असून त्यामुळे सुविधांपासून प्रवासी व कर्मचारी वंचित राहिले आहे. यामध्ये एसी बसेस खरेदी व भाड्याने घेण्यापासून अपघातांत जीवितहानीचे प्रमाणे कमी व्हावे यासाठी स्टीलची एसटी, कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय इत्यादींचा समावेश आहे. एसटी महामंडळापासून गेल्या चार ते पाच वर्षांत १५ कोटी प्रवासी दुरावले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत; परंतु हे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरतानाच दिसतात. गेल्या दोन ते तीन वर्षांत एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा व सेवा आणण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यातील एकाचीही आतापर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना एसटी महामंडळाने येत्या काही वर्षांत एसी बस वाढवण्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने ५00 एसी शिवशाही बसेस भाड्याने घेतानाच १,५00 नवीन बसेसची खरेदी केली जाणार होती. अजूनही या बसेस दाखल झालेल्या नाहीत. मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय, पहिले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह शिवशाही बसेस यांची घोषणा तर परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनीगेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात थाटामाटात केली; परंतु या सर्वांची अंमलबजावणी झालेली नाही. हीच परिस्थिती एसटीच्या अन्य प्रकल्प व प्रस्तावांचीही आहे. यामध्ये राज्यातील एसटी स्थानक व आगारांतील साफसफाईसाठी निविदा, बस स्थानके अद्ययावत करणे, आधुनिक बस पोर्ट, असे अनेक प्रस्ताव ठप्पच आहेत.उभारण्याचा निर्णय घेतला. २५ टक्के जागा या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती दिली होती. ..............................स्वच्छतेचा विसरचएसटी स्थानकांमध्ये असलेली अस्वच्छता, धुळीने माखलेल्या बसेस, प्रसाधनगृहांमध्ये असलेली अस्वच्छता व दुर्गंधी, चालक-वाहकांच्या रेस्ट रूमचीही झालेली दुरवस्था पाहता, एसटी महामंडळ स्वच्छतेला गांभीर्याने घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. याची गांभीर्याने दखल घेत आणि प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार एसटी महामंडळाने स्वच्छतेसाठी राज्यातील सर्व स्थानकांत सफाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खासगी संस्था किंवा कंपन्यांना काम देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. २0१७च्या जानेवारीपासून सर्व स्थानकांत स्वच्छतेसाठी संस्था किंवा कंपन्यांची नेमणूक केली जाणार होती; परंतु त्याचा विसर पडलेला आहे. .....अद्ययावत बस स्थानके व पोर्टएसटी स्थानके अद्ययावत करताना पोर्टही उभारण्यासाठी एसटी महामंडळाकडून दोन वर्षांत प्रयत्न करण्यात आले. एसटी स्थानकांवर ‘आधुनिक बसतळांसह व्यापारी संकुल’उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतानाच सुरुवातीला नऊ स्थानकांवर या प्रकल्पाला सुरुवात करताना त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आणि यात नऊ स्थानकांचा समावेश केला; परंतु या प्रकल्पाचे काम पुढे सरकलेले नाही. राज्यातील अन्य काही स्थानके अद्ययावतही केली जाणार होती. तेही मागे पडत गेले. .....................कंप्युटरायझेशन रखडलेएसटी महामंडळाचे संपूर्ण कंप्युटरायझेशन केले जाणार होते. १९९0 पासून हा प्रकल्प हाती घेण्यावर वारंवार निर्णय झाले; परंतु त्याची कठोर अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे महामंडळ अजूनही यात मागेच असल्याचे दिसते. .............................‘एसटीचा प्रवास, विनाअपघात प्रवास’ असे घोषवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाने अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी व ती कमी करण्यासाठी बसच्या बांधणीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व बसेसच्या बांधणीसाठी पोलादाचा वापर केला जाईल, असे सांगण्यात आले होते. एका बसमध्ये असा प्रयोग करण्यात आला आणि त्याची कार्यशाळेत चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती महामंडळाने दिली; पण त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. १,५00 नवीन बसेस: महामंडळाकडे गेल्या दोन वर्षांत नवीन बसेस दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे एसटी बसची कमतरता भासत आहे. जवळपास १,५00 नवीन बसेसची एसटी महामंडळाला गरज आहे आणि त्यासाठी महामंडळाकडून आता प्रयत्न केले जात आहेत. ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’धावत्या एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यासाठी महामंडळाने सर्व बसना ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. बसचा ठावठिकाणा तसेच त्या वेळेत धावत आहेत की नाही, याची माहितीही समजेल. साध्या आणि सेमी लक्झरी बस सोडता सर्व शिवनेरी व्होल्वो बसना ही सिस्टीम बसविण्यात आली आहे. अद्ययावत नियंत्रण कक्षएसटीचे अपघात, बसची दुरवस्था, अस्वच्छतेचा अभाव पाहता, तक्रारी व मदतीसाठी एसटी महामंडळाने २४ तास अद्ययावत नवे नियंत्रण कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, एक वर्ष उलटले तरी नवी यंत्रणा उभी राहिलेली नाही...................
एसटी महामंडळाची नुसतीच ‘चाय पे चर्चा’ सुरू
By admin | Published: March 14, 2017 7:39 AM