नव्या मंत्रीमंडळात केवळ सुभाष देसाईंचं खातं कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 03:26 PM2020-01-07T15:26:11+5:302020-01-07T15:26:50+5:30
शिवसेनेकडून पुन्हा संधी देण्यात आलेल्या नेत्यांची खाती बदलण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील आघाडीच्या काळात नेत्यांनी भूषवलेली मंत्रीपदं देणे टाळले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना कधीही काम न केलेलं खातं मिळालं आहे.
मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप अखेर पार पडलं. या मंत्रीमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील दिग्गज मंडळी पुन्हा एकदा मंत्रीपदी विराजमान झाली. मात्र यापैकी अनेक नेत्यांना आधी उपभोगलेली मंत्रीपदे मिळाली नाहीत. यामध्ये सुभाष देसाई अपवाद ठरले आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेच्या अनेक नेत्यांना मंत्रीपदं देण्यात आली होती. यापैकी अनेक नेत्यांना उद्धव ठाकरेंनी डच्चू दिला आहे. यामध्ये दीपक केसरकर, दिवाकर रावते, रवींद्र वायकर, रामदास कदम या नेत्यांचा समावेश आहे. मात्र सुभाष देसाई या मंत्रीमंडळातही कायम आहेत. फडणवीस सरकारमध्ये देसाई यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म मंत्र्यालायाचा कारभार सोपविण्यात आला होता. यावेळी देखील त्यांच्याकडे हीच जबाबदारी सोपविण्यात आले आहे. यात मराठी भाषा मंत्रालयाचा भार अधिकचा देण्यात आला आहे.