ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ६ - संशयावरुन अटक झाली म्हणून सनातन संस्थेवर बंदी घालणे अशक्य असल्याचे मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मांडले आहे. समीरचे फोनवरील संभाषण हा एकमेव पुरावा पोलिसांच्या हाती आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मंगळवारी अकोला येथे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सनातनवरील बंदीसंदर्भात पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सनातन दोषी आढळल्यास कारवाई करु असे स्पष्ट केले. कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडविरोधात फक्त फोनवरील संभाषण हा एकमेव पुरावा होता. पण हल्ली प्रत्येकजण फोनवर बोलतच असतो. केवळ संशयाच्या आधारे अटक झाली म्हणून सनातनवर बंदी घालता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.