शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अवघे ठाणे बनले मराठामय

By admin | Published: October 17, 2016 3:02 AM

ठाण्यातही या मोर्चाने गर्दीचा विक्रम मोडीत काढून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही त्रास होणार नाही, या पद्धतीने हा मूक मोर्चा यशस्वी करून दाखवला.

ठाणे : राज्यात ठिकठिकाणी ज्या पद्धतीने मराठ्यांचे क्रांती मोर्चे निघाले होते, त्याचपद्धतीने ठाण्यातही या मोर्चाने गर्दीचा विक्रम मोडीत काढून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही त्रास होणार नाही, या पद्धतीने हा मूक मोर्चा यशस्वी करून दाखवला. मोर्चामुळ रविवारी सकाळपासूनच ठाणे शहर मराठामय झाले होते. सकाळी रेल्वेतून, बसमधून, खाजगी वाहनांतून उतरणारी भगवी गर्दी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. जसजसा जमाव एकत्र होत गेला, आपला हुंकार सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एकवटत गेला, तसे या अथांग जनसमुदायाचे विराट रूप ठाणेकरांना पाहायला मिळाले. तीनहातनाक्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहाजवळ हा मोर्चा विसर्जित झाला. या मोर्चामुळे संपूर्ण शहर भगवे बनले होते. ठिकठिकाणी हातात भगवे झेंडे घेतलेले मोर्चेकरी, चौकाचौकांत लावलेले फलक, झेंडे, छत्रपती शिवरायांच्या पोशाखात सहभागी झालेली लहान मुले या मोर्चाचे खास आकर्षण ठरले. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही बिघडू नये, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. याची काळजी जशी वाहतूक पोलिसांनी घेतली, तशीच मोर्चात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनीही घेतली आणि अतिशय शिस्तबद्धरीत्या आणि शांततेच्या मार्गाने हा मूक मोर्चा मराठा समाजबांधवांनी यशस्वी करून दाखवला. मोर्चा सकाळी १० वाजता निघणार असला, तरी त्याची तयारी आदल्या दिवसापासूनच सुरू होती. पूर्वसंध्येला ठिकठिकाणी या मोर्चाच्या व्यवस्थेबाबत रंगीत तालमी घेण्यात आल्या. सकाळी ७ वाजल्यापासूनच मोर्चेकरी जसे जमेल, तसे तीनहातनाक्यावर जमा होत होते. महिलांसाठी वेगळी रांग आणि पुरुषांसाठी वेगळी रांग अशा पद्धतीने मोर्चात सहभागी होण्याचा नियम ठरवण्यात आला होता.सकाळी १०.४५ च्या सुमारास जिजाऊंना मानवंदना देत हा मोर्चा मार्गक्रमणा करू लागला. मल्हार चित्रपटगृहामार्गे गोखले रोड, गावदेवी मैदानाला वळसा घालून पुढे जांभळीनाका, कोर्टनाका असे करीत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहाजवळ ‘एक मराठा लाख मराठा’ म्हणत हा मोर्चा विसर्जित झाला. कोंडी होऊ नये, वाहनांना जागा देण्यासाठी ठिकठिकाणी उद््घोषणा सुरू होत्या. तीनहातनाक्यावर येण्यासाठी मुलुंड चेकनाका, आनंदनगर चेकनाका, नितीन, कॅडबरी कंपनीपर्यंत लाखोंचा भगवा जनसमुदाय दिसत होता. खाजगी वाहनांमुळे कोंडी होऊ नये, यासाठी रेल्वेने मेगाब्लॉक रद्द करून ४० अतिरिक्त लोकल सोडल्या. मोर्चाच्या मार्गावर सीसीटीव्ही आणि वॉच टॉवर्सद्वारे लक्ष ठेवण्यात आले. नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस मदत कक्ष आणि आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. व्हिडीओ शूटिंग सुरू होते. तर, ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही नजर ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)