ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - स्वभाषेतून रोजगार मिळाला तरच भाषा टिकेल. भाषेबाबत आपण उदासीन आहोत. मराठी भाषिक अस्मितेचा उद्रेक व्हायला हवा, तरच राज्यकर्त्यांना भाषेचं महत्त्व पटेल, असे उद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी काढले.
90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, संमेलनाकडून बरेच काही अपेक्षित असते, ड्मयीन कार्यकर्त्यांना सर्वाच पाठबळ मिळणे महत्त्वाचे आहे.म्हणून वझेंसारखे उभे राहतात आणि संमेलन पार पडते."
यावेळी मराठी विद्यापीठाच्या मागणीचा जोशी यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले,"83 वर्षांपासून आपण मराठी विद्यापीठ मागत आहोत. मराठी विद्यापीठ होणे आवश्यक आहे. त्यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करण्यास आम्ही तयार आहोत. सगळ्या क्षेत्रमध्ये मराठी हवी, साहित्याचा व्यवहार हा साहित्यात केवळ 15 टक्के असतो. अधिकाधिक प्रवाह मराठीशी जोडले जावेत यासाठी महामंडळ प्रयत्न करत आहेत."
"बृहन महाराष्ट्रात मराठीची स्थिती बिकट आहे.अन्य राज्याप्रमाणे आपण मराठी भाषेचा विकास करावा. बृह्रमहाराष्ट्रासाठी स्वतंत्र नियोजन व्हायला हवे, मंडळाचा अध्यक्ष पदसिद्ध असेल, त्या ठरावच काय झालं. 12 कोटी मराठी जनतेच्या वतीने मागणं मांडतोय, मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, ते आमच्या मागण्यांकडे लक्ष देतील."असे जोशी म्हणाले.