शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."
2
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
3
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
4
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
5
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
6
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन
7
जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
8
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
9
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
10
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
11
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
12
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
13
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
14
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
15
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
16
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
17
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
18
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
19
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
20
"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...  

केवळ महिलांच्या सन्मानासाठी...

By admin | Published: November 20, 2014 1:04 AM

महिला कुठेही कमी नाही, फक्त त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची गरज आहे. मात्र आजही अनेक महिला आत्मविश्वासाअभावी आपल्या कलागुणांना समोर आणू शकत नाही.

सुनीताने गाठला १४०० कि.मी.चा पल्ला : एशिया बुकमध्ये विक्रमाची नोंदनागपूर : महिला कुठेही कमी नाही, फक्त त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची गरज आहे. मात्र आजही अनेक महिला आत्मविश्वासाअभावी आपल्या कलागुणांना समोर आणू शकत नाही. अशा महिलांचा आत्मविश्वास वाढावा, त्या स्वावलंबी बनाव्या आणि समाजात महिलांचा सन्मान वाढावा, या उद्देशाने नागपुरातील प्राध्यापिकेने १४१२ किमी.ची सायकल वारी करून, समाजातील महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. नागपूर ते पाँडेचेरी हे अंतर तीने अवघ्या ७ दिवसात पूर्ण केल्याने, तीच्या कर्तृत्वाची नोंद एशिया बुक आॅफ रेकॉर्डने केली आहे. ४२ वर्षीय सुनीता क्षीरसागर धोटे या खेळाडू वृत्तीच्या आहे. मात्र घरातून खेळाला विशेष प्रोत्साहन न मिळाल्याने त्यांना क्रीडा क्षेत्राला शैक्षणिक वयातच सोडावे लागले. शिक्षण झाल्यानंतर परत क्रीडा क्षेत्रात सहभागी व्हावे, अशी इच्छा असताना, त्यांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर संसारात रमल्यावर खेळापासून त्या पूर्णत: दूर झाल्या. मात्र शारीरिक आणि मानसिक बळकटीसाठी व्यायाम, सायकलिंग करणे सातत्याने सुरू ठेवले. रामदेवबाबा कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. दोन मुले, पती असे त्यांचे कुटुंब आहे. कुटुंब आणि व्यवसाय सांभाळून त्या आपल्या आवडीनिवडीसाठी वेळ देतात. २०११ मध्ये त्यांनी मुंबई ते गोवा ही सायकलवारी केली होती. यावेळी त्यांनी १४० किमी. दररोज सायकल चालविली होती. हा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर समाजासाठी, देशासाठी काहीतरी करावे ही भावना सतत त्यांच्या मनात होती. त्यातच स्वच्छ भारत अभियानाचा नारा पंतप्रधानांनी दिला. या अभियानात एक भारतीय म्हणून आपणही सहभागी व्हावे, या भावनेतून नागपूर ते पाँडेचेरी दरम्यान सायकलवारी करण्याचा निर्णय त्यांनी २ आॅक्टोबरला घेतला. ७ नोव्हेंबरपासून त्यांनी अभियानाला सुरुवात केली. झिरो माईल येथून त्यांचा प्रवास सुरू झाला. सरासरी २०० ते जास्तीत जास्त २६० किमी त्या दररोज सायकल चालवायच्या. अवघ्या ७ दिवसात त्यांनी १४१२ किलोमीटरचे अंतर गाठले. यावेळी पाँडेचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करून, एशिया बुक आॅफ रिकॉर्डचे प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)चॅलेंजेस जगण्याची ऊर्जा वाढवितेमिळालेल्या संधीचे सोने करणे हा त्यांचा स्वभाव राहिला आहे. ४२ व्या वर्षात स्विमिंगमध्ये अतिशय यशस्वी डायव्हिंग करून त्यांनी गोल्ड मेडल मिळविले आहे. साधारणत: ४० नंतर महिलांच्या जीवनशैलीत बदल होतो. या वयानंतर त्यांच्यावर दडपणही वाढते. हे दडपण कमी करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येक स्त्रीने खेळ, व्यायाम यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नवीन चॅलेंजेस स्वीकारल्यानंतर जगण्याची ऊर्जा वाढते, जीवन सुंदर होते. डॉ. सुनीता क्षीरसागर धोटे, सायकलपटू