शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कांजुरमार्गमध्ये ‘दृश्यम हत्याकांड’ उघड

By admin | Published: July 18, 2016 5:11 AM

दारूच्या नशेत गरोदर वहिनीसह वृद्ध आईला मारहाण करणाऱ्या लहान भावाची हत्या केली.

मुंबई : दारूच्या नशेत गरोदर वहिनीसह वृद्ध आईला मारहाण करणाऱ्या लहान भावाची हत्या केली. मात्र, भानावर आल्यानंतर अटकेच्या भीतीने हे प्रकरण लपविण्यासाठी कुटुंबीयांनी दारूच्या नशेत काचेवर पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा जबाब देत पोलिसांना चकवा दिला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास बंद केला. मात्र, गुन्हे शाखेने या ‘दृश्यम हत्याकांड’ची उकल करत आरोपीला अटक केली आहे. कांजुर गावात ८ जुलै रोजी हे हत्याकांड घडले. यामध्ये जिटो डिसुजाची हत्या झाली. नायझिल डिसुजा हा पत्नी नमिता, ६२ वर्षीय आई आणि जिटो आणि जिआॅन या दोन भावांसोबत राहतो. ८ जुलैच्या रात्री अडीचच्या सुमारास जिटो दारूच्या नशेत घरी आला. अशात सात महिन्यांची गरोदर असलेल्या वहिनीसह वृद्ध आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेला जिटो ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. अशात रागाच्या भरात जिआॅनने स्वयंपाकघरातील चाकूने जिटोवर वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात जिटो खाली कोसळला. तेव्हा जिटोची हत्या झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. यामध्ये आपली चूक नाही. त्यामुळे आपण शिक्षा का भोगायची, या विचाराने कुटुंबीयांनी हे प्रकरण लपविण्यासाठी सर्वांनी एकच जबाब देत, पोलिसांना चकवा देण्याचे ठरविले. त्यानुसार, जिटोला सायन रुग्णालयात दाखल केले. दारूच्या नशेत काचेवर कोसळल्याने जिटो जखमी झाल्याची माहिती त्यांनी रुग्णालयाला दिली. बेशुद्धावस्थेत असलेल्या जिटोला १४ जुलै रोजी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कांजुर पोलीस तेथे दाखल झाले. कुटुंबीयांनी सदस्यांचे जबाब नोंदवून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास थांबवला. कुटुंबीयांतील वृद्ध आईसह इतर सदस्यांचे जबाब सारखे असल्याने, पोलिसांना संशय आला नाही. जिटोची अंत्यविधी उरकून कुटुंबीयांनी घरी परतून सुटकेचा निश्वास सोडला. अशातच गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय वर्तविला. सुर्वे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला. सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रवीण पाटील आणि संतोष मसदुत यांच्या पथकाने या गुन्ह्यांची उलटतपासणी सुरू केली. रुग्णालयातील डॉक्टरांकडून या प्रकरणी हत्येचा संशय वर्तविण्यात आला. त्यामुळे घटनेच्या दिवशी घरात भांडणे झाल्याचे समजताच, तपास पथकाने डिसुजा कुटुंबीयांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसी खाक्या दाखवताच जिआॅनने गुन्ह्याची कबुली दिली आणि वरील गुन्ह्याचा सर्व घटनाक्रम उघडकीस आणला. (प्रतिनिधी)>अंत्यविधी पार पाडलाचाळीतल्या खोल्यांमधून मिळणाऱ्या भाड्यांवर या कुटुंबीयांचा उदनिर्वाह होत असे.कुटुंबीयांतील वृद्ध आईसह इतर सदस्यांचे जबाब सारखे असल्याने पोलिसांना संशय आला नाही. जिटोची अंत्यविधी उरकून कुटुंबीयांनी घरी परतून सुटकेचा निश्वास सोडला.