मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेनंतर कर्नाटकातीलकाँग्रेस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला होता. यामुळे कर्नाटकात खळबळ उडाली होती. शिंदेंनी महाराष्ट्रासारखेच ऑपरेशन नाथ कर्नाटकात राबविले जाणार असल्याचे म्हटले होते. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवसा स्वप्न पाहत आहेत. आमचा एकही आमदार विकला जाणार नाही. कोणत्याही किंमतीत कर्नाटकमधील आमचे सरकार पाडू शकणार नाहीत. यावेळी भाजपप्रणित एनडीए लोकसभा निवडणूक हरणार आहे, असे प्रत्युत्तर सिद्धरामय्या यांनी दिले.
त्यांनी यापूर्वी असे प्रयत्न केले आहेत, परंतु ते फेल झाले आहेत. यामुळे पुन्हा ते असा प्रयत्न करतील का? काँग्रेस इंडिया आघाडीद्वारे ही निवडणूक जिंकणार आहे आणि सत्तेत येणार आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.
तर काँग्रेसचे संकटमोचक उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या नेतृत्व महाराष्ट्र सरकारमध्ये राहिल की नाही याचीच शाश्वती नाहीय, असे ते म्हणाले.