Opinion Poll: शिवसेनेच्या नाकी'नऊ'; भाजपाच 'मोठा भाऊ'; काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही कमी पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 05:35 PM2019-10-18T17:35:37+5:302019-10-18T17:35:53+5:30

मूड महाराष्ट्राचा या एबीपी आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील सरकार तातडीने बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्या 55 टक्के आहे.

Opinion Poll: BJP is 'big brother'; Shivsena Even less favorable than the Congress-NCP, shiv sena got 9 percent | Opinion Poll: शिवसेनेच्या नाकी'नऊ'; भाजपाच 'मोठा भाऊ'; काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही कमी पसंती

Opinion Poll: शिवसेनेच्या नाकी'नऊ'; भाजपाच 'मोठा भाऊ'; काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही कमी पसंती

Next

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि सी-व्होटर या संस्थांकडून सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यात भाजपा पक्षाला सर्वाधिक पसंती आहे. राज्यात भाजपाचं सरकार येईल, असे 48.8 टक्के लोकांना वाटतंय. मात्र, या टक्केवारीत शिवसेनेला पंसती कमीच पंसती आहे. शिवसेनेला केवळ 9 टक्के लोकांची पसंती आहे. विशेष, म्हणजे राज्यातील दुसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला संधी असून राष्ट्रवादीची सत्ता येईल, असे 11.3 टक्के नागरिकांना वाटतंय. या निवडणुकीत

राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल?

भाजप 48.8 टक्के
शिवसेना 9 टक्के
काँग्रेस 10.6 टक्के
राष्ट्रवादी 11.3 टक्के
इतर 11.3 टक्के
सांगता येत नाही 8.9 टक्के

मूड महाराष्ट्राचा या एबीपी आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील सरकार तातडीने बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्या 55 टक्के आहे. तर, 46 टक्के लोकांना सरकार बदलाव असं वाटत नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अद्यापही 44.7 टक्के लोकांची पसंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. तर, 54.5 टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदी नवा चेहरा हवा आहे. मात्र, सत्तास्थानी जरी भाजपा-सेना पक्षाला पसंती असली तरी, शिवसेनेला कमी पसंती मिळत आहे. त्यामुळे या सर्वेनुसार शिवसेनेच्या नाकी नऊ आले म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर, शिवसेनेच्या नाकी नऊ अन् भाजपाचा मोठा भाऊ असल्याचं एबीपी आणि सी व्होटरचा सर्व्हे सांगत आहे. 

तुमच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार होईल?
भाजप 37.7 टक्के
शिवसेना 17.7 टक्के
काँग्रेस 13.4 टक्के
राष्ट्रवादी 16.1 टक्के
इतर 6 टक्के
सांगता येत नाही9.1 टक्के

तुम्हाला तुमचा आमदार तातडीने बदलायचा आहे का?

होय 54.7 टक्के

नाही 43.1 टक्के

माहित नाही 2.2 टक्के

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री तातडीने बदलू इच्छिता?

होय 54.5 टक्के

नाही 44.7 टक्के

माहित नाही 0.8 टक्के

Web Title: Opinion Poll: BJP is 'big brother'; Shivsena Even less favorable than the Congress-NCP, shiv sena got 9 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.