जळगाव : टँकरने पाणीपुरवठा करणे तांत्रिकदृष्या योग्य नसल्याने पाण्याचे नवीन स्त्रोत शोधून पाणीपुरवठ्याचा प्रयत्न करावा, असे विधान करणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी टँकरने पाणीपुरवठा होणार नाही का? असे विचारताच पत्रकारांपेक्षा विरोधक बरे, असे म्हणत ते पत्रकारांवरच घसरले. आपल्याला निवडणूक लढवायची आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठकही घेतली. ते म्हणाले, विरोधक सध्या एका गोष्टीचे भांडवल करीत आहेत की, केंद्र शासनाच्या दुष्काळ मॅन्युअलनुसार दुष्काळ ३० आॅक्टोबर रोजी जाहीर करावयाचा होता. मात्र राज्याने तो आधीच जाहीर करून टाकला. त्यामुळे मॅन्युअलचे पालन न केल्याने ‘एनडीआरएफ’मधून मदत मिळणार नाही. मात्र आम्ही सर्व नियम पाळले आहेत. त्यामुळे मदत मिळण्यात अडचण नाही.
पत्रकारांपेक्षा विरोधक बरे; चंद्रकांत पाटील घसरले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 3:48 AM