नंदुरबार : धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देऊन आरक्षण देण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने त्याविरोधात आदिवासी समाज पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी येथे सांगितले.१७ जानेवारीला नांदुरी येथे होणाऱ्या आदिवासी एकता परिषदेत राज्यव्यापी लढा देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. शासनाने निर्णय घेतलाच तर त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठीही आदिवासी हक्क संरक्षण परिषद सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. मेगा रिचार्ज प्रकल्पासह दमणगंगा, नारपार आणि पिंजार प्रकल्पाचे सुतोवाच जलसंपदा मंत्र्यांनी केले आहे. हे प्रकल्प आदिवासींना विस्थापीत करणारे आहेत. त्यामुळे या प्रकल्पांनाही आदिवासी हक्क संरक्षण परिषदेचा विरोध राहणार आहे. त्यासाठीही लढा उभारला जाणार असल्याचे वळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
धनगर आरक्षणाला विरोध करू - वळवी
By admin | Published: January 06, 2015 1:56 AM