शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंनी काय आश्वासन दिलं?
3
बाळाचे बारसे करून पुण्याला निघाले अन्...; 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह'ने घेतला चौघांचा जीव
4
कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले; केंद्राकडून निर्यात शुल्कातही २०% कपात
5
धक्कादायक! फळांच्या ज्युसमध्ये लघवी मिसळून विकत होता दुकानदार, २ जण अटकेत 
6
काँग्रेस आमदार झुबेर खान यांचं निधन, दीड वर्षांपूर्वी झालं होतं लिव्हर ट्रान्सप्लान्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता, मानहानी संभवते!
8
₹५००० च्या SIP मधून बनवू शकता ₹२.६० कोटी, पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
9
Bigg Boss Marathi Season 5: आर्याने निक्कीला कानाखाली मारलं, पण असं कुठे दिसलं? मराठी अभिनेत्रीचा सवाल
10
१७ षटकार अन् ५ चौकारांसह फास्टर सेंच्युरी! MI स्टार 'विष्णू'च्या तुफान फटकेबाजीसमोर गोलंदाजांचा 'विनोद'
11
अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला आणि बँकेत नॉमिनीच नाहीये तर, कोणाला मिळणार पैसे? जाणून घ्या
12
तृप्ती डिमरीला लागली मोठी लॉटरी, आता शाहिद कपूरसोबत रोमांन्स करताना दिसणार
13
ENG vs AUS : ओपनर Matthew Short चा बॉलिंगमध्ये अनोखा पराक्रम! असं त्यानं केलं तरी काय?
14
१९८४ मधील अपहृत विमानात वडील होते; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा गौप्यस्फोट
15
Arvind Kejriwal News: १२ हजार कॅश, ४० हजारांची चांदी... किती आहे दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल यांची नेटवर्थ?
16
आर्याला निक्कीच्या कानशिलात लगावणं पडणार महागात, जावं लागेल घराबाहेर?, होणार मोठा निर्णय
17
महायुतीमधील जागावाटपाचा ७५ टक्के तिढा सुटला; निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी
18
८ वर्षाच्या प्रयत्नानंतर शेवटी नशीब फळफळलं; शेतकऱ्याला मिळाला १.५ कोटींचा हिरा
19
रशियाने ‘नाटो’लाही युक्रेन युद्धात ओढले; क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पुतिन यांचा इशारा
20
स्पर्धेत जिंकण्यासाठी इतके खाल्ले की जागेवरच झाला स्पर्धकाचा मृत्यू

बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून सुरेश प्रभु यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेतले - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 11:03 AM

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आले असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

नागपूर - केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आले असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नागपूरमध्ये निवडक संपादकांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केले.

काँग्रेस रस्त्यावरील लढाईत कमी पडत असल्याचेही त्यांनी मान्य केले. भाजपाची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मोदी यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. यामागे अमेरिकेचा हात होता व भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले. काही उच्चपदस्थ अधिका-यांच्या बोलण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी फसले आणि त्याचा फटका आता संपूर्ण देश भोगत आहे, असा आरोपही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नागपुरात सोमवारी त्यांनी वृत्तपत्रांच्या संपादकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध बाबींवर आपले मत प्रकट केले.

नरेंद्र मोदींना अर्थशास्त्राचे ज्ञान नाही. नोटाबंदीनंतर पैसे मोजण्यास मोठा कालावधी लागला. नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा झाला. यात प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार झाला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी ज्यावेळी विदेशात जातात तेव्हा येथील गोष्टींचे ‘मार्केटिंग’ त्यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र ते तेथे विक्रेते म्हणून न जाता खरेदीदार बनून जातात. सोबतच चेकबुक घेऊन जातात. अशा पद्धतीने परदेशात मोठमोठे करार होत असतील तर कुठलाही देश त्यांचे ‘रेड कार्पेट’ स्वागत करेलच, असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले.

२०१४ पासून काँग्रेसचे महाअधिवेशन नाही२०१४ नंतर कॉंग्रेसचे अखिल भारतीय स्तरावरील महाअधिवेशन झालेले नाही, अशी माहिती दिली. कॉंग्रेस रस्त्यांवरील आंदोलनात कुठे तरी कमी पडत आहे. ‘सोशल मिडीया’वरील प्रचार-प्रसारातदेखील मागे पडत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

बुलेट ट्रेनचा फायदा जपानला

बुलेट ट्रेनला आपला विरोध असल्याची भुमिका यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. बुलेट ट्रेनमुळे जपानमध्ये अक्षरश: बंद पडलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. या ट्रेनमुळे आपल्या देशाचा कमी आणि जपानचाच जास्त फायदा आहे, असे चव्हाण म्हणाले.मोदी संघावर पडले भारी

संघाच्या मुशीतून तयार झालेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र त्यांनाच भारी पडले आहेत. संघाच्या पदाधिका-यांचे मोदी ऐकत नाहीत, त्यामुळे संघाला त्यांचा संताप आला आहे. राम माधव, विनय सहस्त्रबुद्धे यांना फेरबदलाच्या वेळी मंत्रीमंडळात स्थान देण्यात यावे, अशा संघाचा आग्रह होता. मात्र मोदींनी त्यांना डाववले. त्यामुळे पुढील २ वर्षात मोदींना शह देण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. निर्मला सितारमन यांना अनुभव नसतानादेखील संरक्षण मंत्रालयासारखे मोठे खाते कसे काय मिळाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे परराष्ट्र खाते अक्षरश: पोलिसी खाक्याप्रमाणेच चालवत आहेत, असा चिमटादेखील यावेळी चव्हाण यांनी काढला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण