शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

संजय राऊत यांच्याविरुद्ध खदखद

By admin | Published: September 28, 2016 5:28 AM

शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या कार्टूनचा निषेध म्हणून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि दोन आमदारांनी राजीनामा दिल्याचे वृत्त सोशल मीडियामधून ‘व्हायरल’

- यदु जोशी, मुंबई

शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या कार्टूनचा निषेध म्हणून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि दोन आमदारांनी राजीनामा दिल्याचे वृत्त सोशल मीडियामधून ‘व्हायरल’ होताच एकच खळबळ उडाली. यानिमित्ताने मुखपत्राचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांच्याविरुद्ध पक्षात खदखद असल्याचे समोर आले. बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, सिंदखेडराजाचे आमदार शशिकांत खेडेकर हे आज मंत्रालयात आलेले होते. आपल्या जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत ते काही मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना भेटले. सायंकाळी त्यांची सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुप्त बैठक मंत्रालयातच सुरू असल्याची बातमी पसरली. सूत्रांनी सांगितले की विधानसभेत पक्षाचे गटनेते असलेल्या शिंदेंकडे जाधव, रायमूलकर आणि खेडेकर यांनी मुखपत्रात मराठा मोर्चाची खिल्ली उडविणारे व्यंगचित्र छापून आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आमच्या जिल्ह्यातया प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून मराठा समाजच नाही तर शिवसैनिकदेखील संतप्त आहेत. अशा परिस्थितीत आमच्यावर राजीनाम्याचा दबाव आहे, या शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचा इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे खेडेकर आणि त्यांच्याच जिल्ह्याचे खासदार असलेले जाधव आणि आमदार रायमूलकर यांच्या राजीनाम्याची चर्चा गरम असताना त्यांचे फोन ‘नॉट रिचेबल’ झाले. जाणकारांच्या मते या तिघांचे मंत्रालयात एकत्रित येणे, त्यांची शिंदे यांच्याकडे बैठक होणे हा योगायोग नक्कीच नव्हता. शिवसेनेच्या मुखपत्रात, मातोश्रीवर आणि दिल्लीतही संजय राऊत यांचे प्रस्थ आणि स्वत:चा टेंभा मिरविण्याने नाराज असलेले अनेक जण या कथित योगायोगा मागे होते, असे म्हटले जाते. शिवसेनेतील कोणत्याही आमदार, खासदारांनी राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्ट करीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी वादावर पडदा टाकला. मुखपत्रात छापून येणारे लेख आणि बातम्या, ‘मातोश्री’वरून येतात की कार्यकारी संपादकच त्या बाबत परस्पर निर्णय घेतात या विषयी शिवसेनेतच उलटसुलट चर्चा असते. भाजपा आणि शिवसेनेत चांगले संबंध राहू नयेत, अशी भूमिका घेऊन बरेचदा मुद्दाम लिहिले जाते. केंद्र, राज्य सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कडवट भाषा गळी उतरविली जाते, अशीही एक भावना आहे. इरादे मेरे हमेशा साफ होते है...

‘इरादे मेरे हमेशा साफ होते है, इसलिए कई लोग मेरे खिलाफ होते है’ अशा आशयाचा सूचक मजकूर ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी फेसबूकवर शेअर केला. राऊत अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रि या देतात. या वेळी मात्र त्यांनी दोन दिवसांनंतरही मौन बाळगणे पसंत केले.हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा विघ्नसंतोषीपणा : देसाईसामनामधील व्यंगचित्राचा वाद निवळलेला असताना वातावरण पुन्हा पेटविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केला. या दोन पक्षांच्या नेत्यांनी गेली १५ वर्षे सत्ता भोगताना मराठा समाजासाठी कोणतीही ठोस योजना आणली नाही. आरक्षणाचा फार्स केला. ही नामुष्की लपविण्यासाठी आता ते शिवसेनेवर आगपाखड करीत आहेत. मराठा क्रांती मोर्चांमध्ये डौलाने फडकणारे भगवे झेंडे विरोधी पक्षांना बघवत नसावेत. विरोधकांचा विघ्नसंतोषीपणा जनता खपवून घेणार नाही व मराठावीर विचलित होणार नाहीत, असे देसाई यांनी म्हटले आहे.