पालघर : प्रकल्पबाधित शेतकरी, आदिवासी, भूमिपुत्र व ग्रामस्थांचा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी होणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाला व या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे शेतकºयांनी जपानच्या जिकाच्या प्रतिनिधींना सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन सर्वेक्षण आमची परवानगी नसताना मोठ्या पोलीस बंदोबस्तात दडपशाहीच्या मार्गाने केले जात असून भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप ही बाधित शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाच्या समोर केला.बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन कंपनीचे प्रतिनिधी कात्सुओ मात्सुमोटो, केंगो अकमाई, मिहीर सोरटी यांनी पालघर व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पबाधित व गावकऱ्यांची २२ व २३ जानेवारी रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधीत तेथील वास्तव जाणून घेतले. या भेटीदरम्यान आढळून आलेल्या परिस्थिती संबंधीचा अहवाल ते जिका कंपनी तसेच भारत व जपान सरकारला सादर करणार असल्याची माहीती जिकाच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.जिका प्रतिनिधींनी बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित ग्रामस्थांशी वैयिक्तक संवाद साधत, प्रकल्पबाधिताचे म्हणणे जाणून घेतली. जिकाच्या प्रतिनिधींनी डहाणू तालुक्यातील कोटबी तसेच तलासरीतील धामणगाव आणि आमगावकरांची भेट घेतली व बुलेट ट्रेनबाबत त्यांची मते जाणून घेतली. दुसºया दिवशी हनुमाननगर, कल्लाळे येथील ग्रामस्थांची त्यांनी भेट घेतली.भाडेही न परवडणारेबुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी भारु डी गावातील जवळपास ६० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. बुलेट ट्रेनचे प्रवासी भाडे महाग असल्याने तेवढी आमची ऐपत नसल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. बुलेट ट्रेनसाठी खर्च करण्यापेक्षा रेल्वे सुधारण्यासाठी, आरोग्य व शिक्षण यावर हा पैसा खर्च करावा अशी मागणीही यावेळी येथील भूमिपुत्रांनी केली.
जिकाच्या प्रतिनिधींसमोर बुलेट ट्रेनला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 3:44 AM