शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उपनिरीक्षकपदाच्या विभागीय परीक्षा रद्दला खात्यातील तरूण पोलिसांचा विरोध

By जमीर काझी | Published: July 12, 2021 5:46 AM

पोलिसांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडे: ...तर गुणवत्तेवर अधिकारी होण्याची संधी डावलली जाणार

ठळक मुद्देपोलिसांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडे...तर गुणवत्तेवर अधिकारी होण्याची संधी डावलली जाणार

जमीर काझीमुंबई : राज्य सरकार पोलीस कॉन्स्टेबलला निवृत्तीपूर्वी उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याच्या पवित्र्यात आहे. मात्र त्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाकडून होणाऱ्या विभागीय उपनिरीक्षक पदाच्या (डीपीएसआय) परीक्षा रद्द करण्याला खात्यातील तरुण पोलिसांनी विरोध केला आहे. या निर्णयामुळे गुणवत्तेवर अधिकारी होण्यापासून वंचित होणार असल्याने, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना साकडे घातले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक पदासाठी एमपीएससीकडून सरळ सेवा स्पर्धेतून ५० टक्के, तर खात्यांतर्गत कॉन्स्टेबलच्या २५ टक्के पदे भरली जातात, उर्वरित २५ टक्के पदे ही पोलीस महासंचालकांकडून अर्हता परीक्षा घेऊन भरण्यात येत आहेत. 

अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी प्रत्येक कॉन्स्टेबल रिटायरमेंटपर्यंत उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचवा, या हेतूने एकूण चार प्रमोशन देण्याचा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला आहे. त्यासाठी या पदाची सरळसेवेद्वारे भरली जाणारी ५० टक्के पदे वगळता उर्वरित पदासाठीची परीक्षा रद्द करून या जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे सुचविले आहे. त्याबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. 

...म्हणून परीक्षा रद्द करण्याला विरोधपोलीस दलातील जवळपास ६५ हजारांवर कॉन्स्टेबल ३५च्या आतील आहेत, गुणवत्ता असूनही घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे शक्य नसल्याने ते आर्थिक स्थिरतेसाठी विविध शाखेतील पदवीधर, द्विपदवीधर असूनही शिपाई म्हणून भरती झाले. मात्र त्यांच्यात अधिकारी बनण्याची उर्मी कायम असून, चार वर्षांच्या सेवेनंतर विभागीय परीक्षेला पात्र ठरत असल्याने त्याची तयारी करीत असतात, मात्र नव्या प्रस्तावानुसार अंमलबजावणी झाल्यास त्यांना पीएसआय होण्यास किमान २५-२८ वर्षे सेवा करावी लागेल.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील