शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
4
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
5
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
6
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
7
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
8
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
10
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
11
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
12
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
13
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
14
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
15
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
16
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
17
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
18
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
19
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
20
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

गुजरातमध्ये दलितांना झालेल्या मारहाणीचा संघाकडून निषेध

By admin | Published: July 21, 2016 2:40 PM

गुजरातमधील गीर-सोमनाथ जिल्ह्यात दलित तरुणांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे. सामाजिक समरसता बिघडविण्याचा हा प्रयत्न असून आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २१ : गुजरातमधील गीर-सोमनाथ जिल्ह्यात दलित तरुणांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे. सामाजिक समरसता बिघडविण्याचा हा प्रयत्न असून आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे. सामढियाला या गावात गोरक्षेच्या नावाखाली काही जणांनी दलित तरुणांना अमानुषपणे मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत.

संघाच्या गुजरात प्रांतातर्फे या घटनेचा निषेध करणारे पत्रक जारी करण्यात आले आहे. जातीच्या आधारावर होणारा भेदभाव, अन्याय, अत्याचार यांची आम्ही निंदा करतो. उना तालुक्यात जी घटना झाली ती निषेधार्ह आहे. गोरक्षेच्या नावाखाली आपल्याच समाजातील बांधवांसोबत अमानवीय व्यवहार हा अपराधच आहे, असा या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सामाजिक समरसतेच्या वातावरणाला बिघडविणारी ही घटना आहे. या परिस्थितीत शांती प्रस्थापित व्हावी यासाठी सरकारसोबतच समाजालादेखील विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अशा घटनांना राजकीय चेहरा देणे किंवा समाजात जातीय तेढ वाढेल असे प्रयत्न करणे अयोग्य असून ते टाळले पाहिजे, असे आवाहनदेखील संघातर्फे करण्यात आले आहे.