शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

आरटीईच्या प्रवेशास विरोध

By admin | Published: April 13, 2015 4:54 AM

तीन वर्षांपासून राज्यात इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत

पुणे : तीन वर्षांपासून राज्यात इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. परंतु, शासनाकडून शाळांना या प्रवेशांसाठीच्या शुल्काचा परतावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे ठोस आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आरटीईचे प्रवेश न देण्याची भूमिका महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज् असोसिएशन(मेस्टा)ने घेतली आहे.कायद्यानुसार शाळांना आरटीईचे प्रवेश नाकारता येत नाहीत. मात्र शासनाने या विद्यार्थ्यांचे शुल्क शाळांना देणेही बंधनकारक आहे. मात्र, ‘मेस्टा’च्या ८ हजार शाळांपैकी एकाही शाळेला ३ वर्षांपासून हे शुल्क मिळालेले नाही, असे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सांगितले. काही शाळांना शासनाकडून ५० हजार रुपये तर काही शाळांना १० लाख रुपयांपर्यंत रक्कम येणे बाकी आहे. मेस्टाने शासनाकडे शुल्क प्रतिपूर्तीची मागणी वारंवार करूनही शासनाने आजपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असेही ते म्हणाले.शासनाने जाहीर केलेले २५ टक्के आरक्षित जागांचे प्रवेश शुल्क संस्था चालकांना मान्य नाही. तसेच इंग्रजी शाळांना ऐच्छिक पार्श्वभूमीवर १०० टक्के अनुदान द्यावे, २५ टक्के आरक्षित प्रवेशाबाबत पूर्व प्राथमिक वर्गाला सक्ती करू नये, प्रवेश घेताना पूर्वीच्या शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करावा, शैक्षणिक संस्थांना विविध करांमधून सूट द्यावी, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार आणि मोफत पाठ्यपुस्तके देण्यात यावीत अशा मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांना देण्यात आल्याचेही सिंग यांनी सांगितले.