शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

‘समृद्धी’च्या मोजणीला विरोध

By admin | Published: April 08, 2017 4:44 AM

मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये

टिटवाळा/बिर्लागेट : मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये, ही शेतकऱ्यांची मागणी फेटाळून लावत शुक्रवारी कल्याण तालुक्यातील राया, निंबवली, गुरवलीत जमिनीच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले. प्रचंड प्रमाणात पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, दंगलविरोधी पोलीस पथक तैनात करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत कडाडून विरोध केला. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाला गेले महिनाभर विरोध सुरू आहे. बाधित होणाऱ्या दहा गावांपैकी तीन गावांत जमिनीची मोजणी होणार असल्याने गुरूवारी पोलिसांनी शेतकऱ्यांची बैठक फळेगावात घेतली. तेव्हा मुख्यमंत्री, शरद पवार, संघर्ष समितीच्या नेत्यांची बैठक होईपर्यंत मोजणी करू नये, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तरीही मोजणीचा निर्णय झाल्याने राये गावाजवळ फळेगांव, उशीद, दानबाव, उतणे, चिंचवली, निंबवली, गुरवली, रूंदेव नदगाव येथील शेकडो शेतकरी काळ््या फिती लावून जमले. नंतर प्रचंड पोलीस फौजफाट्यासह कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे आणि मोजणी करणाऱ्या दोन टीम आल्या. पोलिसांच्या एका तुकडीने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखून धरले, तर दुसऱ्या तुकडीने मोजणी करणाऱ्यांना संरक्षण पुरवले. त्यानंतरही घोषणा सुरूच राहिल्याने राज्य राखीव पोलीस दल, दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आल्याने शेतकरी भडकले. आमच्याच जमिनी बळजबरीने घेत आहात आणि आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देत असल्याचा निषेध त्यांनी केला. ‘शेती आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची,’ ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय,’ ‘आमचा रु पया दुपारी, मोदी सरकार भिकारी,’ अशा घोषणांनी भर उन्हात वातावरण अधिकच तापले. शेतकऱ्यांचा विरोध प्रखर होत गेल्याने पोलिसांनी स्त्रियांसह शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. (वार्ताहर)>जबरदस्ती नाहीसमृद्धी महामार्गामुळे कल्याणच्या ग्रामीण भागातील १०७ हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. मोजणीनंतरच कुणाची किती जमीन जाईल, ते समजेल. त्यात कोणतीही जबरदस्ती करण्यात येत नाही. सध्या राया, निंबवली व गुरवलीत मोजणी झाली आहे.- किरण सुरवसे, तहसीलदार ,कल्याण ही सरकारची हुकूमशाही व जबरदस्ती आहे.शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही राज्यातून शेतकऱ्यांना एकत्र करू.- विश्वनाथ पाटील, कुणबी सेनाप्रमुख शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असतानाही पोलिसी बळाचा वापर करून हा सर्व्हे केल्याने भविष्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. - चंद्रकांत भोईर, समन्वयक, संघर्ष समिती, कल्याण मोजणी शांततेत सुरू होती. शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यांनी स्वत:हून जेलभरो आंदोलन केले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. - प्रशांत कदम, अप्पर पोलीस अधीक्षक