शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

ब्रिटिशकालीन रस्ता ठरू शकतो पर्याय

By admin | Published: May 03, 2017 6:05 AM

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध ब्रिटिश गव्हर्नर मॅलेट यांनी १८५० मध्ये लावला. त्या वेळी माथेरानच्या वरच्या भागात

अजय कदम / माथेरानमाथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध ब्रिटिश गव्हर्नर मॅलेट यांनी १८५० मध्ये लावला. त्या वेळी माथेरानच्या वरच्या भागात बांधलेले बंगले यांच्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची ने-आण ज्या रस्त्याने झाली, तो रस्ता शासनाने पर्यायी रस्ता म्हणून विकसित करण्याची मागणी केली आहे. १९७४ पर्यंत म्हणजे १२५ वर्षे वापरात असलेला रस्ता नेरळ-माथेरान घाट रस्त्याची निर्मिती झाल्यानंतर विस्मृतीत गेला आहे. मात्र, आदिवासी लोक या रस्त्याचा आजही वापर करीत राज्याच्या रस्ते विकासात नोंद असलेल्या माथेरानच्या या पर्यायी मार्गाची निर्मिती माथेरानचा पर्यटन व्यवसाय वाढविणारा ठरणार आहे. दरम्यान, माथेरानच्या रामबाग पॉइंटच्या पायथ्याशी राज्य परिवहन मंडळाची एसटी येत असल्याने पाच किलोमीटरचा पक्का रस्ता निर्माण केल्यास माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मुंबईच्या आणखी जवळ येऊ शकते.ब्रिटिशांनी माथेरानचा शोध लावला तेव्हा चौक-कर्जत रस्त्यावरील बोरगाव-सोंडेवाडी या पायवाट रस्त्याने माथेरानचा पायथा गाठला होता. पुढे माथ्यावरील त्या थंड हवेच्या रानात पोहचण्यासाठी ब्रिटिशांनी जो मार्ग अवलंबिला, तो मार्ग होता सध्याचा रामबाग पॉइंट. माथेरानमध्ये १८५० मध्ये मुंबई प्रांताचे गव्हर्नर असलेले मॅलेट यांनी पहिला बंगला बांधला. तो बाइक हा बंगलादेखील याच रामबाग पॉइंटच्या रस्त्यावर आहे. त्या वेळी ब्रिटिशांनी माथेरानच्या वरच्या भागात अनेक बंगले बांधले. त्या सर्व बंगल्यांसाठी लागणारे बांधकाम साहित्य आणि त्या बंगल्यामध्ये राहण्यासाठी ये-जा बोरगाव भागातून सोंडेवाडी आणि तेथून रामबाग पॉइंट या रस्त्याने केली आहे. माथेरानच्या वन ट्री हिल पॉइंटपर्यंत या रस्त्यावर त्याकाळी ब्रिटिशांनी काही किलोमीटरची दगडी पायवाटदेखील बांधली होती. ती साधारण ५-७ फूट रुंदीची पायवाट अस्तित्वात आहे. त्यावेळी शासनाने माथेरानसाठी पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यास सोंडेवाडी ते रामबाग पॉइंट हा जेमतेम ६-७ किलोमीटरचा रस्ता मजबूत करावा लागेल. दुसरीकडे बोरगावपासून पुढे माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या सोंडेवाडीपर्यंत एसटी येते. त्यामुळे ब्रिटिशांनी किमान ९५ वर्षे वापरलेला आणि पुढे नेरळ-माथेरान घाट रस्ता निर्माण होण्यासाठी सर्व ज्या रस्त्याचा वापर करीत तो रस्ता तयार करण्याची मागणी नितीन सावंत यांनी केली आहे. माथेरानच्या या पर्यायी रस्त्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा नितीन सावंत करीत आहेत.शासनाला अत्यंत कमी खर्चात माथेरानला पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग सापडला असून मुंबई आणि पुणे ही महानगरे या रस्त्याने आणखी जवळ येऊ शकतात. वेळेची, इंधनाची बचत करणारा हा पर्यायी मार्ग माथेरानमधील व्यापार उदीम वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. माथेरानमध्ये वाहनांना असलेली बंदी लक्षात घेता ब्रिटिश वापरत असलेला तो रस्ता पर्यायी मार्ग म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतल्यास वनट्री हिल भागात नवीन दस्तुरी नाका निर्माण होऊ शकतो. माथेरानकरांच्या वतीने नितीन सावंत यांनी आपल्या मागणीचे निवेदन माथेरान नगरपालिकेला दिले आहे.रामबाग पॉइंट पायथ्याशी एसटीमाथेरानमधील रामबाग पॉइंटच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यामधील लोकांसाठी राज्य परिवहन मंडळाची सेवा सुरू आहे. तेथपर्यंत आलेला डांबरी रस्ता आणि या डांबरी रस्त्यावरून महाराष्ट्र परिवहन मंडळाची कर्जत-बोरगाव-पोखरवाडी मार्गे ताडवाडी अशी सेवा सुरू असताना त्या भागातील आदिवासी लोक दररोज माथेरानला नोकरीच्या निमित्ताने चालत येत असतात. ब्रिटिशकालीन रस्त्याची सुरु वात पुढे कायम असल्याने आणि रस्ता अस्तित्वात असल्याने माथेरान हे पर्यटनस्थळ मुंबईच्या आणखी जवळ आणण्यासाठी हा पर्यायी मार्ग सुरू करावा, अशी मागणी पंचक्र ोशीतील आदिवासी नेहमी करीत असतो, अशी माहिती खालापूर पंचायत समितीच्या सदस्या कमल भस्मा यांनी दिली.ब्रिटिशांनी शोधलेले माथेरान आणि तेथे येण्यासाठी त्यांनी शोधलेला रस्ता माथेरानच्या पर्यटन व्यवसायाच्या भरभराटीसाठी मैलाचा दगड ठरू शकतो. या ऐतिहासिक रस्त्याचे संवर्धन राज्य शासनाने करण्याची गरज असून रस्ता अस्तित्वात असल्याने रस्ता रु ंद केल्यास रस्त्याच्या निर्मितीतील सर्व अडचणी दूर होऊ शकतात.-नितीन विश्वनाथ सावंत