अकोला: पश्चिम विदर्भातील संत्रा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. यंदाच्या हंगामात उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली तरी विदर्भातील संत्र्याला गुणवत्ताच नसल्याने प्रतिकिलो दर १५ रुपयांवरून चार ते पाच रुपयांपर्यंत कोसळले आहेत. अशा परिस्थितीत सरकारकडून संत्रा उत्पादकांना मदत देण्यास विलंब होत असल्याने पुढील हंगामही अडचणीत येण्याची शक्यता आहे. विदर्भात संत्र्याचे अमरावती जिल्ह्णात सर्वाधिक उत्पादन होते. त्यापाठोपाठ नागपूर आणि अकोला जिल्ह्णाचा क्रम लागतो. अमरावती जिल्ह्णात ९0 हजार हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. नागपूर जिल्ह्णात ४0 हजार हेक्टर, तर अकोला जिल्ह्णात २0 हजार हेक्टरवर उत्पादन होते. दरवर्षीच्या सरासरीनुसार विदर्भात हेक्टरी १२ ते १५ टन उत्पादन होते. बांंगलादेश आणि भूतानसारख्या देशांमध्ये विदर्भातील संत्री निर्यात केली जातात. विदर्भातून दर दिवसाला १५ हजार टन संत्री निर्यात केली जातात. यावर्षीही संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. लहरी पावसानंतरही उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी थंडीचा फटका बसल्याने चव बिघडली आहे. गुणवत्ता नसल्याचा फटका विदर्भातील संत्रा उत्पादकांना बसला. यावर्षी संत्री विकत घेण्यासाठी व्यापारी पुढे येत नसल्याने तिन्ही जिल्ह्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्री फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेले उत्पादन आणि विदर्भातच संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा अभाव, यामुळे यावर्षी उत्पादनात वाढ होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या संत्र्यास दर मिळू शकले नाही. त्यातच अनियमित पाऊस आणि थंडी संत्र्याच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे ठरले.
संत्रा उत्पादक शेतकरी संकटात, मदतीपासूनही राहिले वंचित!
By admin | Published: January 14, 2016 3:02 AM