राहूल वाडेकर, ऑनलाइन लोकमत
विक्रमगड, दि. २४ - विक्रमगड़ तालुक्यातील एकमेव कंपनी इस्टिंम इंडस्ट्रीयल ह्या कंपनीला वाडा उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नंदलकर यांनी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्यामुळे सादर कंपनीचे उत्पादन प्रदुषण निर्माण करणाऱ्या घटकाचे उस्तर्जन व कंपनीचे उत्पादन पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कंपनीच्या सोडण्यात आलेल्या कैमिकल युक्त पाण्यामुळे आलोंडे ह्या गावातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झ्ाले आहे.तसेच ह्या कैमिकल युक्त पाण्यामुळे गावातुन वाहणाऱ्या ओहळात पूर्णपणे पाणी फेसाळ बनल्यामुळे ह्या ओहळातील मासे,खेकडे मोठ्या प्रमाणात मृत पावले होते.
मात्र ह्या शासकीय आदेशामुळे शेकडो स्थानिक तरुणांवर बेरोजगरचे संकट उभे राहिले असून पुन्हा एकदा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर कंपनीच्या वेवस्थापनाकड़े विचारणा केली असता हे घटना ही एखाद्या अधन्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हे जाणून-भुजं केले असून ह्याबबत आम्ही विक्रमगड़ पोलिस स्टे. येथे गुन्हा नोंदविला आहे.तसेच झ्ालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास कंपनीप्रशासन तयार आहे.मात्र पुढील शासकीय आदेश येईपर्यंत आम्ही कंपनीचे उत्पादन थांबवत आहोत.
प्रतिक्रिया
सदर कंपनी बंद झ्ाल्यास येथील स्थानिक असलेल्या शेकडो आदिवाशी तसेच इतर समाज्याच्या तरुणांवर बेरोजगाराची कुराड कोसळून अनेक संसार रस्त्यावर येतील.त्यासाठी कंपनी बंद करने हा पर्याय नासून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झ्ाले आहे त्यांना तत्काल नुकसानभरपाई देऊन ही कंपनी चालू ठेवावी..व कंपनीने आपली सुरक्षावेवस्था वाढऊन असे प्रकार पुढील काळात घडू नयेत याची काळजी घ्यावी.
- डॉ.सिद्धार्थ सांबरे , सामाजिक कार्यकर्ते
-------------------------------------
मी विक्रमगड तालुक्यातील बोरसेपाडा येथील तरुण असून आलोंडा येथील कंपनी चालू झ्ाल्याने मला येथे रोजगार मिळाला.गेली चार वर्ष मी ह्या कंपनीत काम करतो व माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. जर ही कंपनी प्रशाशासनाने बंद केल्यास मी व माझ्यासरख्या अनेक आदिवाशी तरुणांवर बेरोजगरिची कुऱ्हाढ कोसळनार आहे.त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
- बाळू सहारे, (आदिवाशी स्थानिक कामगार)
शासनाने तदकाफड़की निर्णय घेऊन आलोंडा येथील इस्टिंम प्रा.ली. कंपनीला सील ठोकला आहे त्यामुळे आमच्यावर बेरोजगरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे शासनानीयोग्य तो निर्णय घेऊन ही कंपनी त्वरित चालू करावी.नाहीतर येथील बेरोजगार झालेल्या तरुणांना पर्यायी वेवस्था निर्माण करुन द्यावी. नाहीतर ह्या कंपनीत शेकडो बेरोजगार झ्ालेल्या तरुणांना आंदोलन करावे लागेल.
- सतेज ठाकरे, ( स्थानिक कर्मचारी)