मुंबई : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे परळीतील घर आणि शेती जप्त करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत.
परळीतील संत जगमित्र सूत गिरणीने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर येथील सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना परळीतील त्यांचे घर आणि शेती जप्त करण्याची नोटीस पाठविली आहे, असे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणात परळी पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.