शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

अक्कलकोटमध्ये जमीन गैरव्यवहारप्रकरणी ५ कोटी ३५ लाखांची रक्कम भरून घेण्याचा आदेश

By admin | Published: July 04, 2016 10:24 PM

५ कोटी ३५ लाखांची रक्कम भरून घेण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 4-  अक्कलकोट शहरालगतची गट नं ६३२ क्षेत्र ही ३५ एकर नोकर इमान या वतनाची जमीन शासनाच्या मंजुरीशिवाय विक्री झाल्याप्रकरणी सध्याचे मालक विलास कोरे, महमद शुकूर बेपारी, मुकसिनी कामले, शोएब कामले, ऐजाज मुतवली यांच्याकडून ५ कोटी ३५ लाखांची रक्कम भरून घेण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे.याबाबत महापालिकेचे नगरसेवक नाना काळे यांनी तक्रार केली होती़ गेल्या तीन-चार वर्षापासून ही प्रकरण चर्चेत होते़ देवरे यांनी निकाल देऊन बाजारभावानुसार रक्कम भरावी असे आदेश दिले आहेत़ वरील जमीन ही शर्तीची असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय विक्री करता येत नाही़ सदरची जमीन ही कसबे अक्कलकोट गट क्रमांक ६३२ असून १३़७३ हेक्टर ऐवढे क्षेत्र आहे़ गाव नोकर वतनाची असून १० डिसेंबर १९८० रोजी प्रांताधिकाऱ्यांनी बॉम्बे सर्व्हीस इनाम युजफूल कम्युनिटी अ‍ॅबोलशन अ‍ॅक्ट १९५३ चे कलम ५(२) अन्वये इप्तेकार करीम खतीब यांना मूळ वतनदार म्हणून जमीन परत केलेली आहे़ ५ जून १९८१ रोजी प्रांताधिकाऱ्यांनी नविन शर्त म्हणून नोंद केली़ ही जागा हस्तांतरण न करता येणारी किंवा वाटप न करता येणारी असून वापरात बदल करावयाचा झाल्यास बाजार मुल्याच्या ५० टक्के व साऱ्याच्या २० पट रक्कम भरावी लागेल असे नमूद आहे़ मात्र ११ आॅक्टोबर १९९४ च्या खरेदीदस्त पाहता शर्तभंग झाल्याचे दिसून येते़ याबाबत नाना काळे यांनी या जमीनीचा व्यवहार करु नये़ अटी आणि शर्तीचा भंग केल्यामुळे ही जमीन शासनाकडे जमा करुन घेण्याची मागणी केली होती़ त्यानुसार अक्कलकोट तहसीलदारांनी आपला अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे १५ एप्रिल २०१५ रोजी दिला होता़ प्रांताकडून हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी देवरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी १५ जून २०१६ रोजी आदेश देऊन या प्रकरणी ५ कोटी ३५ लाख १२ हजार एवढी रक्कम शासन तिजोरीत भरुन अहवाल सादर करावा असा आदेश प्रांतांधिकाऱ्यांना दिला आहे़ कोरे, बेपारी,कामले, मुतवली असे पाच मालक सध्याअसून त्यांनी ३० एप्रिल २०१३ रोजी ५ लाख ७३ हजार ५०० रुपये शासनाकडे जमा केले आहेत़ ही रक्कम शासन आदेशानुसार नाही त्यामुळे आजच्या बाजारभावाप्रमाणे जी किंमत होते त्या किंमतीच्या ७५ टक्के रकमेतून ५ लाख ७३ हजार ५०० एवढी रक्कम वगळून उर्वरीत ५ कोटी ३५ लाख १२ हजार इतकी रक्कम शासन तिजोरीत भरुन जमीन नियमित करुन घ्याचवी असे म्हटले आहे़ सध्या या जमीनीचा भाव ७ कोटी २१ लाख असल्याचे अहवालात नमूद आहे़ मी बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा करत होतो़ सदरची जमीन शासन जमा करण्याची माझी मागणी होती़ बऱ्याच दिवसानंतर आणि माझ्या पाठपुराव्यामुळे ५ कोटी ३५ लाख भरण्याचे आदेश काढल्याचे नाना काळे यांनी सांगितले.

अक्कलकोट शहरालगत ही जमीन असून तिचा शर्तभंग झाल्याचा अहवाल तहसीलदारांकडून प्राप्त झाला होता़ एनए झालेली ही जमीन असून सध्याच्या बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम भरुन व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे़ तसा आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे़ पैसे न भरल्यास सदर जमीन शासन जमा होईल.प्रवीण देवरे,अपर जिल्हाधिकारी