आरएसएस मानहानीप्रकरणी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 03:03 PM2018-01-17T15:03:54+5:302018-01-17T15:13:10+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी ते गैरहजर असल्याने त्यांची बाजू वकील नारायण अय्यर यांनी मांडली असता न्यायालयाने त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

The order for Rahul Gandhi to appear present the court in the Defamation case | आरएसएस मानहानीप्रकरणी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

आरएसएस मानहानीप्रकरणी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Next

ठाणे- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी ते गैरहजर असल्याने त्यांची बाजू वकील नारायण अय्यर यांनी मांडली असता न्यायालयाने त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केल्याचा आरोप त्यांनी प्रचारसभेत केल्याने भिवंडी न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात हजर झाले होते. महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली, असे विधान राहुल गांधी यांनी भरसभेत केले होते. या प्रकरणावरूनच भिवंडी न्यायालयात राहुल गांधींविरोधात सुनावणी सुरू आहे.

 राहुल गांधींच्या या विधानावर आक्षेप नोंदवत संघाकडून भिवंडी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सोनाळे गावातील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा .स्व. संघावर टीका केल्याने, त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात 6 मार्च 2014 रोजी याचिका दाखल केली होती. 

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौ-यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का ? असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा वापर करत भाजपा महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करु शकतं. भाजपाच्या आक्रमक धोरणामुळे काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: The order for Rahul Gandhi to appear present the court in the Defamation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.