पुणो : एचआयव्हीग्रस्त असल्याचे ठाऊक असतानाही एका तरुणाने धोक्याने तिच्याशी लग्न करून तिलाही एचआयव्हीची भेट दिली. दरम्यान त्याचा मृत्यूही झाला. या प्रसंगात सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले अन् माहेरच्यांनीही तिच्या आजाराकडे पाहून तिच्यासाठी दारे बंद केली. तिने स्वत:चे बस्तान भाडय़ाच्या घरात हलविले, पण उपचाराचा खर्च पेलताना भाडय़ाच्या रकमेसाठीही तिची फरफट होऊ लागल्याने तिने सासरच्या लोकांविरुद्ध दावा दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. इंगळे यांनी तिला न्याय दिला. सासरच्या लोकांनी तिला घरात राहू द्यावे, असा आदेश दिला. या प्रकरणी सुनंदा (नाव बदलेले आह़े) हिने सासू, सासरा, दीर आणि त्याच्या प}ीविरुद्ध अॅड. कविता शिवरकर यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. (प्रतिनिधी)