गणेश वासनिकअमरावती : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाघांच्या मृत्युची बाब केंद्र सरकारने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. मागील पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीने की नैसर्गिक यासंदर्भात सखोल अभ्यास करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दल (एनटीसीए)ने व्याघ्र प्रकल्पांंना दिले आहेत. वाघ शिकारींचे धागेदोर सीमेपार असल्यामुळे केंद्र सरकारने त्या दिशेने पावले उचलली आहेत.
सन १९७३ मध्ये ९ व्याघ्र संवर्धन प्रकल्पांची स्थापना करण्यात आली. आता देशात ४९ व्याघ्र संवर्धन प्रकल्प असून सन २०१४ च्या व्याघ्रगणनेनुसार २२२६ वाघ असल्याचा अंदाज आहे. मात्र, वाघांचे मृत्यू कशामुळे, वाघांची संख्या नेमकी किती? याबाबत केंद्र शासन अनभिज्ञ आहे. परंतु वाघांच्या मृत्यूची कारणमिमांसा जाणून घेण्यासाठी ‘एनटीसीए’ने सूक्ष्म परीक्षण करण्याचे ठरविले आहे. यात व्याघ्रमृत्युचा व्हिसेरा अहवाल, अहवालाचे परीक्षण, तपास आणि गुप्तवार्ता मिळविण्याच्या कामात बहुशाखीय दृष्टिकोन ठेवून शिकाऱ्यांना जेरबंद करणे, गुप्तवार्ता, गुप्तचर विभाग आणि एसआययू या एजन्सीमध्ये आपसी समतोल ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे, वरिष्ठ स्तरावर वाघांच्या मृत्युची कारणमिमांसा व चर्चा करणे, दर महिन्याला न्याय, पोलीस व महसूल विभागासोबत सन्मवय बैठक घेणे, वाघ मृत्युच्या तपासामध्ये पोलीस खात्याप्रमाणे तपास करणे, अप्रशिक्षित वनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देवून तपासातील उणीवा दूर करणे, व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात सुरक्षा योजना (सिक्युरिटी प्लॅन) कार्यान्वित करणे आदी बाबींवर भर दिला जाणार आहे.
मागील पाच वर्षांत देशभरातील व्याघ्र प्रकल्पांत वाघांचे मृत्यू, शिकारी याबाबत सीमेपार असलेले कनेक्शन शोधून काढण्याचे निर्देश ‘एनटीसीए’ने दिले आहेत. राज्यात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प असून पाच वर्षात वाघांच्या मृत्युबाबतची इंत्यंभूत माहिती पाठवावी लागणार आहे. ताडोबा, मेळघाट, पेंच या व्याघ्र प्रकल्पांत वाघांचे मृत्यू, शिकारी झाल्याचा घटना घडल्या आहेत, हे विशेष.
अत्याधुनिक प्रयोगशाळेची उणिववाघांचे मृत्यू, शिकार झाल्यानंतर त्याचे अवयव, कातडीची तपासणी करण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा व्याघ्र संवर्धन प्रकल्पांकडे नाही. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात बाजू मांडताना वाघांचे अवयव मिळणे आवश्यक असते. किंबहुना या अवयवांचे परीक्षण करणे गरजेचे असते. मात्र, अवयवांचा अहवाल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने याचा फायदा आरोपींना होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आता तपासात येणाऱ्या उणिवा टाळण्यासाठी अत्याधुनिक व शास्त्रीय न्याय सहायक प्रयोशशाळा, सुसज्ज यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.वाघांच्या मृत्युचे द्यावे लागणार सबळ कारणराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीने देशभरातील वाघांच्या मृत्युंचा अहवाल सादर करताना सबळ कारणे देण्याचे निर्देश दिले आहे. वाघांचे मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे दर्शविले जात असले तरी पुराव्यासह अहवाल सादर करावा लागणार आहे. वाघांच्या नैसर्गिक मृत्युबाबत योग्य व सबळ पुरावा सादर न केल्यास त्या वाघाचा मृत्यू शिकारीमुळे झाल्याचे गृहित धरले जाईल, असे ‘एनटीसीए’ने म्हटले आहे.‘‘ वाघांच्या मृत्युबाबत ‘एनटीसीए’ने समिती गठित केली आहे. ही समिती वाघांच्या मृत्युची कारणमिमांसा शोधून केंद्र सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे. मेळघाटात वाघांच्या मृत्युंची एनटीसीएचे नागपूर, बंगळूरचे आयजी तर दिल्ली येथील डीआयजी चौकशी करतील. तसे पत्र देखील प्राप्त झाले आहे.-दिनेशकुमार त्यागी,क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प