शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

आदेशाचे स्वागत

By admin | Published: August 12, 2014 2:54 AM

दहीहंडीतील गोविंदांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नको आणि मनोऱ्यांची उंची २० फुटांपेक्षा जास्त नको, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे मुंबई डबेवाला गोविंदा पथकाने स्वागत केले आहे

मुंबई : दहीहंडीतील गोविंदांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नको आणि मनोऱ्यांची उंची २० फुटांपेक्षा जास्त नको, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे मुंबई डबेवाला गोविंदा पथकाने स्वागत केले आहे. शिवाय उपनगरातील आयोजकांनी या वर्षी दहीहंडी उभारणार नाही, असे प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केले आहे.मुंबई डबेवाला गोविंदा पथक पाच थरांचा सराव करत आहे. पथकाचा सराव अंधेरी रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ६च्या लगत सुरू आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत या गोविंदा पथकाचा सराव सुरू असून, हे गोविंदा पथक दहीहंडी फोडून जी रक्कम जमा होणार आहे; ती माळीणच्या दुर्घटनेत बचावलेल्या रुंद्र लेंबे याला मदत म्हणून देण्यात येणार आहे.दुसरीकडे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीदेखील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात दहीहंडीवर बालगोविंदांना चढविण्याबाबत बंदी घालण्यात यावी, असे म्हटले आहे. शिवाय याच्या अंमलबजावणीबाबत लक्ष घालण्यात यावे, असे म्हटले आहे. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांनी मनेका गांधी यांना यासंदर्भातील पत्र धाडले होते; यावर हे पाऊल उचलले आहे.पार्ल्यातील हंडी रद्दविलेपार्ले येथील काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयाचे स्वागत केले आहे. विलेपार्ले येथील भोगले चौकात उभारण्यात येणारी दहीहंडी या वर्षी उभारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दहीहंडीदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण, जखमी होणारे गोविंदा आणि बालगोविंदांना होणारा त्रास; या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयानंतर अनेक गोविंदा पथकांनी दूरध्वनीहून त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचेही हेगडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. (प्रतिनिधी)